उत्तर प्रदेश: गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष कृती दलाने (STF) राज्यभरात धडक कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. लखनौ, बहराइच, पिलीभीत, अलीगढ आणि बदाऊनसह सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या सात वेगवेगळ्या चकमकींत पोलिसांनी मोठी बक्षीस रक्कम असलेल्या दोन गुन्हेगारांना कंठस्नान घातले आहे, तर इतर अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
https://prahaar.in/2026/06/28/attempt-to-kidnap-girlfriend-boyfriend-killed-in-car-explosion/
चकमकीतील प्रमुख घटना:
१. लखनौ चकमक: मुख्य शूटर ठार लखनौमधील इंदिरा कॅनल रोडवर झालेल्या चकमकीत १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला संजय उर्फ संजीव ठार झाला. संजय हा २७ मे २०२६ रोजी बांधकाम व्यावसायिक संदीप सिंग यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार आणि शूटर होता. खान मुबारक टोळीशी संबंधित असलेला संजय हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा होता.
२. पिलीभीत चकमक: हत्येचा आरोपी एन्काउंटरमध्ये मृत पिलीभीतमध्ये १.७५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला शिवम उर्फ सरबजीत याला पोलिसांनी चकमकीत ठार केले. तो २८ मे रोजी झालेल्या पप्पू गुप्ता हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
३. बहराइचमध्ये दोन बक्षीसप्राप्त गुन्हेगार जेरबंद बहराइचमध्ये दोन स्वतंत्र चकमकींत ५०-५० हजार रुपयांचे बक्षीस असलेले दोन गुन्हेगार फिरोज आणि मुल्कराज यांना पोलिसांनी अटक केली. फिरोजला रामगाव परिसरात, तर मुल्कराजला कैसरगंज भागात अटक करण्यात आली. हे दोघेही अनेक गंभीर गुन्ह्यांत पोलिसांना हवे होते.
https://prahaar.in/2026/06/28/alarm-bells-for-mumbaikars-water-stock-in-supply-lakes-drops-to-7-08-percent/
४. अलीगढ आणि बदाऊनमधील कारवाया
-
अलीगढ: २५ हजार रुपयांचे बक्षीस असलेला गोहत्यार फरमान याला पोलीस चकमकीनंतर जखमी अवस्थेत अटक करण्यात आली.
-
बदाऊन: चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला अटक केली. या चकमकीत एक उपनिरीक्षक जखमी झाला आहे.
५. बुलंदशहरमध्ये बलात्कारी अटकेत बुलंदशहर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या इरफान नावाच्या आरोपीला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. त्याच्याकडून अवैध शस्त्रे आणि चाकू जप्त करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/28/major-suicide-attack-in-karachi-for-pakistan-rangers-killed-in-a-class-five-terrorists-eliminated/
पोलिसांचा इशारा
या सलग कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. “गुन्हेगारांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने आम्ही आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले,” असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणांचा अधिक तपास सुरू असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.