अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर आहे तेवढाच जास्त तो घातक ठरत आहे. गेल्या आठवडाभरात विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. अशातच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर(Samruddhi Mahamarg) भीषण अपघातझाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
https://prahaar.in/2026/06/28/raigad-ropeway-visiting-raigad-is-set-to-become-cheaper-the-ropeway-ticket-price-will-be-reduced-from-%e2%82%b9350-to-between-%e2%82%b950-and-%e2%82%b9100/
कसा झाला अपघात ?
अमरावती(Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर एक चार चाकी वॅगनार कार आणि ट्रक यांच्यात मोठी धडक झाली. चंद्रपूरहून मुंबईच्या(Chandrapur-mumbai)) दिशेने निघालेल्या वॅगनार कारने पुढे जात असलेल्या भरधाव ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला असून कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चैनल क्रमांक १०५ जवळ हा भीषण अपघात झाला.
https://prahaar.in/2026/06/28/anant-ambanis-devotion-becomes-a-topic-of-discussion-among-devotees-reliance-industries-donates-%e2%82%b927-crore-to-the-tirupati-balaji-temple/
एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या पाचही जणांचा एकाच कुटुंबाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाहतूक मंदावली
या भीषण अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली. अपघातग्रस्त वाहन आणि ट्रक यामुळे वाहतूक विस्कळीत झाली मात्र वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक कार्यवाही सुरू केली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरु झाली.