Home ब्रेकिंग न्यूज Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार

Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार

0
Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार
Karachi Suicide Attack

– ‘जमात-उल-अहरार’ संघटनेने स्वीकारली जबाबदारी

कराची : भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या कराची शहरात शनिवारी रात्री मोठा आत्मघाती हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील युनिव्हर्सिटी रोडजवळ अचानक जोरदार आवाजासह स्फोट झाले. यावेळी एका मागोमाग गोळीबारही सुरु होता. घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्युत्तर कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तसेच काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी ‘जमात-उल-अहरार’ या संघटनेने घेतली आहे. हा एक मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. (Karachi Suicide Attack)

https://prahaar.in/2026/06/28/late-night-panic-in-south-mumbai-underground-bmcs-cable-catches-fire-near-bhendi-bazaar-atmosphere-of-fear-in-the-area/

अधिक माहिती अशी की, कराचीमध्ये आत्मघाती हल्ल्याचे नियोजन अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले होते. हल्ला रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास झाला. जेव्हा स्फोटकांनी भरलेली गाडी सिंध रेंजर्सच्या पॅरामिलिटरी मुख्यालयाच्या मुख्य गेटला धडकली. यामुळे मोठा स्फोट झाला. दहशतवादी गाडीतून मुख्य गेट तोडून थेट परिसरात घुसले आणि गोळीबार सुरू केला. यावेळी सातत्याने ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. यामुळे परिसरात अनेक स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच कराची पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंकडून सुमारे ९० मिनिटे गोळीबार चालला. यात विशेष सुरक्षा युनिट, अँटी टेररिस्ट फोर्स आणि घटनास्थळी उपस्थित रेंजर्स यांनी दहशतवाद्यांवर नियंत्रण आणले. या कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. (Karachi Suicide Attack)

https://prahaar.in/2026/06/28/rohit-shetty-receives-another-death-threat-extortion-demand-of-%e2%82%b920-crore-investigation-looks-into-bishnoi-gang-connection/

कराचीतील या हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित जमात-उल-अहरार या संघटनेने घेतली आहे. ही संघटना पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेलगत खैबर पख्तूनख्वा प्रांतात सक्रिय मानली जाते. या संघटनेने यापूर्वीही अनेक हल्ले केले आहेत. जमात-उल-अहरारने दावा केला आहे की या हल्ल्यात ९ दहशतवादी सहभागी होते. मात्र पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी याची अद्याप पुष्टी केलेली नाही. घटनेनंतर परिसरात सुरक्षा एजन्सींकडून शोध मोहीम सुरू आहे. कराची पोलिस देखील अधिक तपास करत आहेत. सुरक्षा दलांनी गुलिस्तान-ए-जौहर आणि युनिव्हर्सिटी रोड परिसर रात्रीच सील केला होता. लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. सिंधचे मुख्यमंत्री आणि पोलिस महानिरीक्षक यांनी या आत्मघाती हल्ल्याचा पूर्ण अहवाल मागितला आहे. घटनेनंतर पोलिस सतर्क दिसत आहेत. (Karachi Suicide Attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here