मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडून संशयित गांजा (मारिजुआना) जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई एका महिला सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून आरोपीला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. (Mumbai Metro One)
नेमकं काय घडलं ?
घटनेनुसार, घाटकोपरकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर नियमित बॅगेज स्कॅनिंग सुरू असताना महिला सुरक्षा रक्षक कांचन पांडे यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतील संशयास्पद वस्तू ओळखली. त्यानंतर बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये गांज्याची नऊ पाकिटे आढळून आली. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे एकूण वजन अधिकृतरीत्या अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. (Mumbai Metro One)
https://prahaar.in/2026/06/27/cyber-crime-income-tax-department-sends-%e2%82%b920-crore-notice-to-poor-female-students-the-family-was-left-reeling-when-the-truth-came-to-light-what-exactly-is-the-matter/
तपासणीदरम्यान आपला भांडाफोड झाल्याचे लक्षात येताच संबंधित प्रवाशाने स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कांचन पांडे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ ड्युटीवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा पथकाने आरोपीचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर ताब्यात घेतले. (Mumbai Metro One)
या कारवाईत सिक्युरिटी ऑफिसर ए. कांबळे, एएसजी अविनाश (MSF), सुपरवायझर वसीम तडवी आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वय आणि तत्परतेमुळे आरोपीला पसार होण्यापासून रोखण्यात यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीला जप्त करण्यात आलेल्या संशयित अमली पदार्थासह अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Metro One)
https://prahaar.in/2026/06/27/sale-of-fake-gold-biscuits-major-action-taken-against-9-individuals/
मुंबई मेट्रो वनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व स्थानकांवर अत्याधुनिक बॅगेज स्कॅनिंग यंत्रणा आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या सुरक्षा यंत्रणेची सतर्कता आणि कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचेही नमूद करण्यात आले. (Mumbai Metro One)
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी म्हणाले, “प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कांचन पांडे आणि संपूर्ण सुरक्षा पथकाने दाखवलेली सतर्कता, धाडस आणि तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे संशयित अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यात यश आले असून मुंबई मेट्रो वन सुरक्षित प्रवासासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.” (Mumbai Metro One)