Home ब्रेकिंग न्यूज Nasrapur Murder Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी, न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करणार

Nasrapur Murder Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी, न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करणार

0
Nasrapur Murder Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी, न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करणार
bhimrao kambale

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (Nasrapur Murder Case) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयाने आज म्हणजेच गुरुवार, २५ जून रोजी आपला निर्णय जाहीर केला. (Nasrapur Murder Case)

शुक्रवार १ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी युद्धपातळीवर करत विक्रमी वेळेत तब्बल १,२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए नमुने, न्यायवैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांचा आधार घेत मजबूत पुरावे गोळा केले. याच पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. (Nasrapur Murder Case)

https://prahaar.in/2026/06/25/air-india-plane-air-india-flight-from-delhi-inadvertently-enters-pakistani-airspace-incident-caused-by-a-technical-glitch/

काय घडले होते?

१ मे रोजी नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीय आणि ग्रामस्थ तिचा शोध घेत असतानाच काही वेळाने तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. नसरापूरसह पुणे शहरातील नवले पूल परिसरातही निषेध आंदोलन करण्यात आले होते. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात आली होती. (Nasrapur Murder Case)

वैज्ञानिक पुराव्यांवर भर :

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्निर्मिती केली. शवविच्छेदन अहवाल, डीएनए चाचणी, कपड्यांवरील नमुने आणि इतर वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. या सर्व पुराव्यांमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. (Nasrapur Murder Case)

https://prahaar.in/2026/06/25/decision-to-take-over-aarey-hospital-deferred-for-now/

आरोपीचा बचाव फोल :

या प्रकरणातील आरोपी भीमराव कोंबळे याने सुरुवातीला स्वतःवरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो चिमुरडीसोबत घटनास्थळाच्या दिशेने जाताना आणि काही वेळानंतर एकटाच परतताना दिसत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. प्रथम आरोपीने फुटेजमधील व्यक्ती आपण नसल्याचा दावा केला. मात्र, व्हिडिओ झूम करून दाखविल्यानंतर त्याने स्वतःची ओळख मान्य केली. त्यानंतर बचावासाठी त्याने वेगळी भूमिका मांडली. (Nasrapur Murder Case)

आरोपीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी तो शेतात गेला होता. तेथे मुलगी आली आणि तिला गोठ्याकडे नेत असताना दोघेही घसरून पडले. त्यावेळी मुलीच्या डोक्याला मार लागल्याने ती रडू लागली. लोक आपल्यावर संशय घेतील या भीतीने आपण तिला तेथेच सोडून निघून गेल्याचा दावा त्याने न्यायालयात केला होता.
मात्र, तपास यंत्रणांनी सादर केलेले वैज्ञानिक पुरावे, न्यायवैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे आरोपीचा हा दावा कमकुवत ठरल्याचे निरीक्षण न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान नोंदविण्यात आले. (Nasrapur Murder Case)

https://prahaar.in/2026/06/25/rainfall-in-the-dams-supplying-water-to-mumbai/

या प्रकरणाचा निकाल समोर आल्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असली, तरी या घटनेने बालसुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यभरात चर्चेत राहिलेल्या या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. (Nasrapur Murder Case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here