रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पर्यटकांसाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी दि. २४ आणि २५ जून २०२६ रोजी पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय :
मंगळवार २३ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजाजवळील पायरी मार्गावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Raigad Fort)
https://prahaar.in/2026/06/24/is-the-wedding-fixed-then-take-note-of-this-new-rule-this-important-information-must-be-included-in-the-wedding-invitation/
तहसीलदार महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. दरम्यान, किल्ले रायगड परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला विशेष बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच इतर प्रवेश बिंदूंवर पोलीस तैनात राहणार आहेत. (Raigad Fort)
https://prahaar.in/2026/06/24/nashik-news-massive-fire-at-a-company-in-the-satpur-industrial-estate/
प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन :
प्रशासनाने पर्यटकांना (Raigad Fort) या कालावधीत पायरी मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, ५४ व ५६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून पुढील सूचना जारी करण्यात येणार आहेत. (Raigad Fort)