मुंबई : Ketan Agarwal Murder Case मध्ये दररोज नवे खुलासे (Revelations) समोर येत आहेत. दरम्यान, केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी (Fiancée) सिया गोयल यांचा एक जुना रोमँटिक व्हिडिओ (Romantic Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसत असून, या नात्यामागे इतका भयानक शेवट दडलेला असेल यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
सियासाठी केतनने दिले होते खास Surprise
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १८ मे रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. सियाच्या वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने केतनने तिच्यासाठी खास सरप्राईज (Surprise) आयोजित केले होते. सियानेही हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) शेअर केला होता.
ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. ताराताला (Taratala) ...
व्हिडिओमध्ये केतन सियाला आपल्या आलिशान कारमध्ये (Luxury Car) बसवताना दिसतो. त्यानंतर तो तिला डोळे बंद करण्यास सांगतो आणि गुलाबाचे फूल (Rose) भेट देतो. पुढे कारचे सनरूफ (Sunroof) उघडल्यावर तिच्या आवडीची फुले दिसतात. हे पाहून सिया आनंदाने हसताना आणि केतनला मिठी मारताना दिसते.
#BREAKING A Pune court remanded Siya Goyal and her lover Chetan Chowdhury to police custody till June 29 for further investigation into the suspected murder of her fiancé Ketan Agarwal. #Pune #CrimeNews @PuneCityPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/b4VUhjXBMs
— jarvis ☠️ (@Vishii14) June 23, 2026
यानंतर दोघे एका रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जातात. तिथे सियासाठी खास संगीत (Music) वाजवले जाते आणि केक (Cake) ठेवण्यात आलेला दिसतो. केतन गुडघ्यावर बसून (Kneel Down) तिला पुन्हा गुलाबाचे फूल देतो. त्यानंतर दोघे एकत्र डान्स (Dance) करतानाही दिसतात. व्हिडिओमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रेम पाहून अनेकजण भावूक होत आहेत.
Nashik : नाशिकमध्ये एक मोठी घटना घडली आहे. नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) प्लास्टिक आणि खोके बनविणाऱ्या एका नामांकित कंपनीला अचानक भीषण आग ...
मात्र, १७ जून रोजी केतन अग्रवालच्या हत्येनंतर (Murder) या व्हिडिओची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सिया गोयलचे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. केतनच्या मृत्यूनंतर सियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) एक भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली होती. त्यामध्ये तिने लिहिले होते की, "तू मला माझ्या वाढदिवशीच सोडून गेलास. आपल्या लग्नाला (Wedding) काहीच महिने उरले होते. तू माझ्यासोबत असं का केलंस? माझं मन सांगतंय की तू इथेच आहेस, परत ये."
या पोस्टसोबत तिने केतनसोबतचा हाच जुना व्हिडिओ शेअर केला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणाचा तपास (Investigation) सुरू असून, आरोपींवरील आरोप न्यायालयात (Court) सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.





