Home साप्ताहिक अर्थविश्व Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत १० पदांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत १० पदांसाठी भरती

0
Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत १० पदांसाठी भरती
Government Job

मुंबई : मुंबईत (Mumbai) उच्च पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटी (Mumbai Port Authority) ने विविध विभागांतील वरिष्ठ पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २ लाख रुपयांपर्यंत मानधन (Salary) मिळणार आहे. विशेष म्हणजे, पात्र कर्मचाऱ्यांना मुंबईत निवासव्यवस्था (Accommodation) देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून एकूण १० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही नियुक्ती कंत्राटी (Contractual) स्वरूपात केली जाणार असून पात्र भारतीय उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/06/23/so-what-municipal-officials-high-handedness/

पदनिहाय मानधन (Salary)

– चीफ मॅनेजर (Chief Manager) – बिझनेस डेव्हलपमेंट (Business Development) : ₹२ लाख प्रतिमहिना

– चीफ मॅनेजर (Chief Manager) – एन्व्हायर्नमेंट (Environment) : ₹२ लाख प्रतिमहिना

– चीफ मॅनेजर (Chief Manager) – कॉर्पोरेट लीगल (Corporate Legal) : ₹२ लाख प्रतिमहिना

– सिनियर मॅनेजर (Senior Manager) – बिझनेस डेव्हलपमेंट : ₹१.६० लाख प्रतिमहिना

– मॅनेजर (Manager) – बिझनेस डेव्हलपमेंट, एन्व्हायर्नमेंट, आयसीटी (ICT) आणि कॉर्पोरेट लीगल : ₹१.२० लाख प्रतिमहिना

कंत्राटाचा कालावधी आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला 3 वर्षांसाठी केली जाईल. संस्थेच्या गरजेनुसार हा कालावधी आणखी २ वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांना वर्षातून २० दिवसांची नैमित्तिक रजा (Casual Leave) तसेच पोर्टच्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा (Medical Facilities) दिली जाणार आहे. याशिवाय, उपलब्धतेनुसार १० टक्के मानधन आणि परवाना शुल्क (License Fee) कपात करून मुंबईत राहण्यासाठी निवासव्यवस्था (Accommodation) उपलब्ध होऊ शकते.

https://prahaar.in/2026/06/23/mumbaikar-kunal-shah-in-the-spotlight-an-inspiring-journey-from-freecharge-to-cred/

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (Official Website) अर्ज डाउनलोड (Download) करावा. अर्ज पूर्ण भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-Attested) प्रती जोडून तो स्पीड पोस्ट (Speed Post) द्वारे पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मॅनेजर (HR),
मुंबई पोर्ट अथॉरिटी,
जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट (General Administration Department),
पोर्ट हाऊस (Port House), दुसरा मजला,
शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट (Ballard Estate),
मुंबई – 400001

अर्जाच्या लिफाफ्यावर (Envelope) अर्ज केलेल्या पदाचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा केवळ रेझ्युमे (Resume) स्वीकारला जाणार नाही.

महत्त्वाची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत (Last Date) ६ जुलै २०२६ आहे. भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अपडेट्स (Updates) मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here