Home ब्रेकिंग न्यूज IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

https://prahaar.in/2026/06/22/will-take-oath-as-an-associate-member-of-the-shiv-sena/

पी. वेलरासू (२००२ बॅच) यांच्या १६ जून रोजीच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून, आता त्यांची ‘एमएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (२००३ बॅच) यांची मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार (२००४ बॅच) यांच्याकडे आता महापारेषणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here