मुंबई : “मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून उद्या विधानपरिषदेत शपथ घेणार आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांनी संधी दिली तर शिवसेना पक्ष संघटनेसाठी काम करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन मी हा निर्णय घेत आहे,” अशी घोषणा नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी सोमवारी रात्री केली.
https://prahaar.in/2026/06/22/deadline-for-polytechnic-admission-applications-extended-to-july-2-over-1-45-lakh-students-registered/
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना तिकीट जाहीर झाले. मात्र, गोकुळ गीते आणि गणेश गीते या भावंडांनी शड्डू ठोकला. भाजपचे प्रसाद हिरेही मैदानात होते. मात्र नेत्यांनी केलेल्या शिष्टाईनंतर प्रसाद हिरे आणि गणेश गीतेंनी त्यांचे अर्ज मागे घेतले.
https://prahaar.in/2026/06/22/icc-takes-a-major-decision-for-women-cricketers/
मात्र गोकुळ गीतेंनी त्यांचा अर्ज कायम ठेवला होता. परिणामी त्यांचे भाऊ गणेश गीतेंनी माध्यमांच्या समोर फोन लावून गोकुळ यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तर प्रतिस्पर्ध्यांनी बाप काढल्याच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या गोकुळ गीतेंनी अर्ज कायम ठेवला होता. माध्यमांसमोर मोठा ड्रामा झाल्यानंतरही गोकुळ गीतेंनी अर्ज मागे घेतलाच नाही. परिणामी महायुतीत मिठाचा खडा पडू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचे प्रयत्न सुरूच होते. गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी बैठका, चर्चा यात खंड पडत नव्हता. मनधरणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनी ओझर विमानतळ परिसरात आणि इतर ठिकाणी बैठका घेतल्या. नेत्यांनी सातत्यानं मनधरणी केल्यानं अखेर गोकुळ गीते यांनी निवडणुकीचा प्रचार थांबवण्याची भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या निकालात वेगळेच चित्र दिसले. निवडणुकीचे मैदान सोडलेल्या गोकुळ गीतेंनीच मैदान मारले.