Home क्रीडा Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय

Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय

0
Women’s Cricket : महिला क्रिकेटपटूंसाठी ICC ने घेतला मोठा निर्णय
ICC

नवी दिल्ली : खेळपट्ट्यांवर चौकार-षटकार मारणारी एखादी खेळाडू जेव्हा आई होण्याचा निर्णय घेते, तेव्हा बऱ्याचदा तिला तिच्या कारकिर्दीला पूर्णविराम द्यावा लागतो. खेळ आणि मातृत्व या दोन वेगवेगळ्या वाटांवरून चालताना होणारी तिची ओढाताण आता थांबणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला क्रिकेटपटूंसाठी ‘प्रसूतीनंतर पुनरागमन’ ही अत्यंत संवेदनशील आणि व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. आई झाल्यानंतरही महिला खेळाडू सन्मानाने आणि सुरक्षितपणे पुन्हा मैदानावर परतू शकतील, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

आज महिला क्रिकेट मोठ्या उंचीवर पोहोचले आहे. खेळात करिअर घडवत असतानाच, अनेक खेळाडू आई बनून कुटुंब सुरू करण्याचा आनंदही घेऊ इच्छितात. पण बाळाच्या जन्मानंतर पुन्हा आधीसारखंच तंदुरुस्त होऊन मैदानात उतरणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सोपं नसतं. खेळाडूंची हीच अडचण ओळखून आयसीसीने त्यांच्या आरोग्याची आणि कल्याणाची संपूर्ण जबाबदारी घेणारे हे पाऊल उचलले आहे.

https://prahaar.in/2026/06/22/atmosphere-of-joy-in-the-state-due-to-the-progress-of-the-monsoon/

महिला खेळाडूला आई होण्याच्या प्रवासापासून ते पुन्हा मैदानात पहिली धाव घेईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण्यासाठी ‘६ आर’ चा एक विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या डॉक्टर फिलिपा इंगे यांच्या नेतृत्वाखाली ही नियमावली तयार झाली आहे. यात केवळ खेळाचाच विचार नाही, तर एका आईच्या व्यावहारिक गरजाही जपल्या आहेत. सरावाच्या वेळात लवचिकता असणे, स्टेडियमवर बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा असणे, आणि प्रवासातही बाळाला सोबत ठेवण्यासाठी मदत करणे, अशा अनेक कौतुकास्पद बाबींचा यात समावेश आहे.

‘६ आर’ चा आधार
१. रेडी : प्रसूतीनंतर आईच्या शरीराला मिळणारा विश्रांतीचा पहिला टप्पा.
२. रिव्ह्यू : तिची शारीरिक आणि मानसिक प्रकृती नेमकी कशी आहे, याची वैद्यकीय तपासणी.
३. रिस्टोर : गमावलेली शारीरिक क्षमता आणि ऊर्जा हळूहळू परत मिळवणे.
४. रिकंडिशन : घाई न करता, शरीराला झेपेल अशा संथ गतीने सराव सुरू करणे.
५. रिटर्न : पुन्हा बॅट-बॉल हाती घेऊन क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात येणे.
६. रिफाईन : ती संघात परतल्यानंतरही तिच्या आरोग्याची आणि तिच्या बाळाची सतत काळजी घेणे.

https://prahaar.in/2026/06/22/fire-in-three-storey-building-in-lucknow-14-dead-pm-announces-relief/

“मातृत्व आणि देशाचे प्रतिनिधित्व; आता दोन्हींची निवड करता येईल”
२०२१ मध्ये मुलाला जन्म देऊन आता २०२६ च्या विश्वचषकात वेस्ट इंडीजकडून खेळणारी अफी फ्लेचर आपली भावना व्यक्त करताना म्हणाली, “प्रसूतीनंतर शारीरिक सुदृढता मिळवणे कठीण होतेच, पण त्याहूनही कठीण होते आपल्या लहान बाळाला घरी सोडून मैदानात जाणे. आयसीसीच्या या धोरणामुळे आता कोणत्याही महिला खेळाडूला तिचे कुटुंब आणि स्वप्न यांपैकी एकाचीच निवड करावी लागणार नाही.”
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले, “कोणत्याही महिला खेळाडूवर आई होण्यासाठी देश सोडून देण्याची वेळ येऊ नये. हा निर्णय केवळ नियमांचा नाही, तर आमच्या खेळाडूंच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महिला खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेरही आनंदाने जगावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here