Home महाराष्ट्र नाशिक Gokul Gite : विजयाच्या काही तासांतच मोठी राजकीय घडामोड; गोकुळ गिते शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

Gokul Gite : विजयाच्या काही तासांतच मोठी राजकीय घडामोड; गोकुळ गिते शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

0
Gokul Gite : विजयाच्या काही तासांतच मोठी राजकीय घडामोड; गोकुळ गिते शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाल्याने त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.

https://prahaar.in/2026/06/22/nashik-gokul-gite-apologizes-immediately-after-the-victory/

‘नंदनवन’ येथे भेटीसाठी निमंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, विजय निश्चित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गिते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे भेटीसाठी निमंत्रण दिले. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील विशेष विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले.

यानंतर आमदार किशोर पाटील यांनी गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गिते आणि त्यांचे बंधू गणेश गिते हे उदय सामंत व किशोर पाटील यांच्यासोबत विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर गिते यांच्या पुढील राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/06/22/girish-mahajan-on-gokul-gite-victory/

विजयानंतर समर्थकांचा जल्लोष

गोकुळ गिते यांच्या विजयाची घोषणा होताच नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे, काही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित गाण्यांवर कार्यकर्त्यांनी नृत्य केल्याने गिते यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.

https://prahaar.in/2026/06/22/yellow-alert-for-nashik-city-tomorrow/

शिवसेनेचे संख्याबळ वाढण्याची शक्यता

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आली होती. पक्षाने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या गोकुळ गिते यांनी विजय मिळवला. आता ते शिवसेनेत प्रवेश करत असल्यास ही जागा पुन्हा महायुतीच्या खात्यातच जाणार असून विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ आणखी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here