Home क्राईम Mumbai Crime : लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराच्या आईलाच टार्गेट; तरुणीने केले अश्लील फोटो व्हायरल

Mumbai Crime : लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराच्या आईलाच टार्गेट; तरुणीने केले अश्लील फोटो व्हायरल

0
Mumbai Crime : लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराच्या आईलाच टार्गेट; तरुणीने केले अश्लील फोटो व्हायरल
mumbaiCrime

मुंबई : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणीने प्रियकराच्या आईलाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

https://prahaar.in/2026/06/22/nashik-death-of-a-marquee-contractor/

नेमकी घटना काय? तक्रारदार महिला एका शासकीय आस्थापनेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा मुलगा आणि आरोपी तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. तरुणी आणि तिचे कुटुंबीय लग्नासाठी सतत आग्रह करत होते. मात्र, तरुणीचा हट्टी स्वभाव, व्यसनाधीनता आणि सोशल मीडियावरील तिचा अतिवावर यामुळे तक्रारदार महिलेचा या लग्नाला विरोध होता.

https://prahaar.in/2026/06/22/massive-fire-at-a-coaching-center-in-lucknow/

बदनामीचा डाव लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीने तक्रारदार महिलेच्या फोटोशी छेडछाड (Morphing) केली. तिने हे आक्षेपार्ह फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले. इतकेच नाही, तर त्या पोस्टसोबत महिलेचा मोबाईल नंबर देऊन आक्षेपार्ह मजकूरही लिहिला. यामुळे महिलेची समाजात बदनामी झाली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तरुणीवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here