मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3 तासांसाठी ऑरेंज वॉर्निंग जारी केली आहे. सकाळी 7 वाजता जारी करण्यात आलेल्या नाऊकास्ट इशाऱ्यानुसार, मुंबईतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/06/22/will-the-iran-us-conflict-be-averted-a-new-framework-for-talks-between-the-two-countries/
हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सकाळी ६ ते ७ या एका तासात मुंबई शहरात सरासरी १७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वरळी परिसरात झाला असून सावित्रीबाई फुले बीएमसी शाळा, वरळी नाका येथे ६१ मिमी पाऊस नोंदवला गेला. जी/दक्षिण विभागात ५८ मिमी, आदर्श नगर शाळा वरळी येथे ४४ मिमी, मलबार हिल येथे ४४ मिमी आणि वरळी सी-फेस येथे ३७ मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain Alert)
पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. वांद्रे येथील पाली चिंबई शाळा आणि सुपारी टँक बीएमसी शाळा परिसरात प्रत्येकी ७० मिमी पाऊस झाला. एच/पश्चिम विभाग कार्यालय परिसरात ३० मिमी, वांद्रे अग्निशमन केंद्रात २८ मिमी तर जुहू परिसरात २५ मिमी पावसाची नोंद झाली.
https://prahaar.in/2026/06/22/ghatkopar-billboard-accident-cost-of-crane-and-crusher-is-approximately-%e2%82%b941-lakh/
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मुंबईतील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.