केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त मत
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
योगचा अर्थ ‘जोडणे’ असा होतो. मन, शरीर आणि आत्मा, या सर्वांचे एकमेकांशी जुळणे तेव्हाच आपल्यामध्ये एक प्रकारचे पूर्णत्व, आनंद आणि सुदृढता या तिन्ही गोष्टी येतात आणि आपण आपल्या आयुष्यात जे काही ध्येय ठरवतो ते साध्य करतो. योग हे समाजाला जोडण्याचे माध्यम बनत असल्याचे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केले. (Yoga Day)
https://prahaar.in/2026/06/22/bmc-news-solution-for-waterlogging-in-the-maharashtra-nagar-area-of-mankhurd/
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga day) वरळी डोमच्या (Worli Dom) सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे रविवारी (२१ जून २०२६) योग सत्राचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी त्या बोलत होत्या. या विशेष सत्रात त्यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे, दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस,
उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री श्रीलीला, शांतीलाल मुथा,डॉ. निवेदिता श्रेयांश पिळे, मेघाश्रय संस्थाच्या संस्थापिका सीमा सिंग आदी मान्यवरांनी योग प्रात्यक्षिक केले. योग सत्रात मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विद्यार्थी व दिवंगत शेतकऱ्यांची मुले सहभागी झाले होते.
या ल याप्रसंगी बोलतांना रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘योगच्या माध्यमातून जगाला एक वेगळी दिशा दिली आहे. भारताने शेकडो वर्षांपासून जगाला बरेच काही दिले आहे, पण अलीकडच्या काळात जग भारताला प्रामुख्याने योगसाठी ओळखते. योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मिळून ‘विकसित भारत संकल्पनेला पुढे नेऊ.’
https://prahaar.in/2026/06/21/ratnagiri-bodies-of-the-remaining-four-youths-from-the-ganpatipule-tragedy-have-also-been-recovered/
मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले, ‘गेली अनेक वर्षे योग दिनाच्या निमित्ताने मुलांना बोलावून त्यांना योगचे शिक्षण देण्याचे कार्य दिव्याज संस्था सातत्याने करत आहे. आणि ते आजही सुरू आहे. यानिमित्ताने मुलांना लहान वयापासूनच योग चे महत्व कळत आहे.
दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘आजपासून आपण सर्व रोज योग करण्याची प्रतिज्ञा घेऊ. मी रोज योग करणार, एकही दिवस सुट्टी नाही घेणार, असा दृढ निश्चय करूया. रोज स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योग गरजेचा आहे.’ या विशेष सत्रात सहभागी योग प्रशिक्षकांनी योग आसनांची प्रात्यक्षिके करुन त्यांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके केली.