पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचा 21 किलो 500 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानातील एका बेवारस बॅगेत हा अमली पदार्थ आढळून आल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
https://prahaar.in/2026/06/20/approximately-%e2%82%b91817-crore-deposited-into-the-accounts-of-90-85-lakh-farming-families-in-the-state/
मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या विमानातील प्रवाशांनी आपापले सामान ताब्यात घेतले. मात्र, एक बॅग बराच वेळ कन्व्हेयर बेल्टवर पडून राहिल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली.
https://prahaar.in/2026/06/20/the-country-is-not-a-dharamshala-free-rest-house-not-a-single-infiltrator-will-be-allowed-to-stay-in-india-amit-shah/
तपासणीदरम्यान बॅगेत मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे एकूण वजन 21.5 किलो असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त झाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित बॅगेचा मालक कोण आहे, ती बॅग कोणत्या प्रवाशाने आणली आणि या प्रकरणामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.