परभणी : राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी परभणी शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत असली तरी संपूर्ण कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.
Pakisthan : पाकिस्तानामध्ये दोन बॉम्बस्फोट, ७ ठार तर अनेक जखमी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakisthan)अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये किमान ...
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसचे पथक मागील काही दिवसांपासून परभणीतील काही संशयित व्यक्तींवर पाळत ठेवून होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून शहरातील विविध भागांत धाडसत्र राबविण्यात आले.गुजरी बाजार परिसरातील काही दुकाने, धार रस्ता परिसरातील
मुमताजनगर तसेच अपना कॉर्नर परिसरातील विविध ठिकाणी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून तपास केला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणांवरील कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी करण्यात आल्याचे समजते.
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडून मरण पावले. ही दुर्घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
दरम्यान, एटीएसच्या कारवाईनंतर परभणी पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. शहरातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची स्थिर पथके तैनात करण्यात आली असून धार रस्ता परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.एटीएसच्या या अचानक
कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या कारवाईचे नेमके कारण, चौकशीचा विषय अथवा कोणाला ताब्यात घेण्यात आले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असून, येत्या काळात या कारवाईसंदर्भातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.