Home क्रीडा Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी;चिलीला हरवत नेशन्स कॅपच्या अंतिम फेरीत धडक

Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी;चिलीला हरवत नेशन्स कॅपच्या अंतिम फेरीत धडक

0
Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी;चिलीला हरवत नेशन्स कॅपच्या अंतिम फेरीत धडक

मुंबई : हॉकीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय महिला हॉकी संघाने शनिवार २० जून रोजी ऑकलंड येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चिलीला पराभूत करून एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने चिलीवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. भारतीय महिला संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे, अंतिम फेरीत त्यांचा विजयाची शक्यता जास्त आहे.

https://prahaar.in/2026/06/20/nashik-crime-news-fraud-of-%e2%82%b987-lakh-in-the-name-of-kalyan-jewellers/

भारताचे चिलीवर वर्चस्व

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चिलीवर दबाव टाकला आणि त्यांना पुनरागमन करू दिले नाही. संघाला सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि याचा फायदा घेत नवनीतने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, १३ व्या मिनिटाला नवनीतने पुन्हा गोल केला. १४ व्या मिनिटाला ड्रॅगफ्लिकर दीपिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी आणखी वाढवली आणि १८ व्या मिनिटाला तिने पुन्हा एकदा गोल करून स्कोअर ४-० असा केला. भारतासाठी नेहा आणि रितुजा यांनीही गोल केले. कर्णधार सलीमा टेटेला तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारताच्या दीपिकाने या सामन्यात दोन गोल केले असून ती स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारी खेळाडू आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना अमेरिका किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एका संघाविरुद्ध होऊ शकतो.

https://prahaar.in/2026/06/20/work-accelerates-in-the-backdrop-of-kumbh-mela/

भारतीय संघाची नेशन्स कपमधील दमदार कामगिरी

न्यूझीलंडमधील ऑकलंड (Auckland, New Zealand) येथे झालेल्या ‘FIH हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६’ मध्ये कर्णधार सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने अजिंक्य राहून अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने ‘पूल ए’ मध्ये अमेरिकेचा ३-२, जपानचा २-१ आणि उरुग्वेचा ३-२ असा पराभव करून साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले आणि त्यानंतर उपांत्य फेरीत चिलीचा ६-० असा धुव्वा उडवला. संपूर्ण स्पर्धेत ४ सलग सामने जिंकत भारताने एकूण १४ गोल केले तर केवळ ५ गोल स्वीकारले, ज्यामध्ये स्टार खेळाडू दीपिकाने उरुग्वेविरुद्ध केलेले महत्त्वपूर्ण दोन गोल आणि आक्रमक कामगिरी विशेष ठरली. याशिवाय, मध्यरक्षक ज्योतीने जपानविरुद्ध आपला १०० वा आणि नेहाने उरुग्वेविरुद्ध आपला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here