Nashik : : राज्यातील अन्न भेसळीविरोधातील कारवाया अधिक तीव्र होत असतानाच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी पहाटे नाशिकच्या दूध बाजारात अचानक भेट देत अधिकाऱ्यांसह छापा टाकला. मंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे बाजार परिसरात काही काळ खळबळ उडाली.
https://prahaar.in/2026/06/19/bribery-case-exposed-again-in-nashik/
भल्या पहाटेच अधिकाऱ्यांसह मारला छापा
जुन्या नाशिकमधील दूध बाजारात सकाळच्या वेळी पोहोचलेल्या मंत्री झिरवाळ यांनी दूध संकलन, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी दूध विक्रेत्यांशी संवाद साधत शहरातील दूध पुरवठ्याबाबत माहिती घेतली. तसेच संशयित दूध नमुने तपासणीसाठी घेण्याचे निर्देश देत काही नमुने अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाकडून भेसळखोरांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झालेल्या या अचानक तपासणीमुळे दूध व्यवसायातील नियमांचे पालन करणाऱ्यांना दिलासा मिळाला असून भेसळ करणाऱ्यांमध्ये मात्र धास्ती निर्माण झाली आहे.
https://prahaar.in/2026/06/19/monsoon-momentum-slows-down-sultry-conditions-persist-across-most-parts-of-the-state/
दरम्यान, घेतलेले दूध नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.