Home ब्रेकिंग न्यूज PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

0
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) चा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. (Dattatray Bharane)

कृषी विभागाच्या वतीने राज्यभर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावागावांत शेतकरी मेळावे, माहिती सत्रे आणि ऑनलाइन कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली जाणार आहे. तसेच गावस्तरावर नियुक्त केलेले अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Agriculture News)

https://prahaar.in/2026/06/19/union-minister-murlidhar-mohol-bereaved-last-rites-to-be-held-in-pune-today/

पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आधार लिंक, e-KYC आणि बँक खात्याशी संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना अद्याप काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळालेला नसल्याने त्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/06/19/minister-zirwal-also-steps-in-to-curb-adulteration/

दरम्यान, शेतकरी ‘Know Your Status’ या सुविधेचा वापर करून आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. हप्ता कोणत्या खात्यात जमा झाला आहे याची माहितीही या माध्यमातून मिळू शकते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात असून 20 जून रोजी होणाऱ्या पीएम किसान उत्सव दिवस कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here