सावधान! शरीर देतेय 'हे' संकेत, तुमच्यात आयर्नची कमतरता असू शकते.

सतत थकवा जाणवणे  पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर आयर्नची कमतरता असू शकते.

वारंवार डोकेदुखी  मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्याने सतत डोकेदुखी होऊ शकते.

थोडे चालले किंवा जिने चढले तरी दम लागत असेल तर हे आयर्न कमी असल्याचे लक्षण असू शकते.

श्वास घेण्यास त्रास होणे

केस गळणे  नेहमीपेक्षा जास्त केस गळत असतील तर शरीरातील आयर्नची पातळी तपासून घ्या.

नखे तुटणे, पातळ होणे किंवा चमक कमी होणे हे देखील एक संकेत असू शकतो.

नखांच्या समस्या

 लक्ष केंद्रित न होणे, वारंवार चक्कर येणे, गोंधळल्यासारखे वाटणे ही आयर्न कमतरतेची लक्षणे असू शकतात.

हृदयाचे ठोके वाढणे  सामान्य काम करतानाही हृदय वेगाने धडधडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आयर्न वाढवण्यासाठी पालक, मेथी, चवळी, डाळी, खजूर, मनुका, डाळिंब, गूळ आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा.

ही लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर रक्त तपासणी करून घ्या.