Home क्रीडा FIFA World Cup FIFA World Cup 2026 : जपानचे शेवटच्या क्षणी दमदार पुनरागमन; नेदरलँड्सविरुद्ध २-२ बरोबरीत रंगला थरार

FIFA World Cup 2026 : जपानचे शेवटच्या क्षणी दमदार पुनरागमन; नेदरलँड्सविरुद्ध २-२ बरोबरीत रंगला थरार

0
FIFA World Cup 2026 : जपानचे शेवटच्या क्षणी दमदार पुनरागमन; नेदरलँड्सविरुद्ध २-२ बरोबरीत रंगला थरार
fifa japan vs netherland

फिफा विश्वचषकातील गट फेरीतील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरलेल्या लढतीत जपानने अखेरच्या क्षणी गोल करत नेदरलँड्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली. टेक्सासमध्ये तब्बल ६९,२८५ प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात जपानने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करत महत्त्वाचा एक गुण मिळवला. (FIFA World Cup 2026)

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सावध खेळ केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये सामन्याला खरी रंगत आली. ५१व्या मिनिटाला नेदरलँड्सचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डायक याने शानदार हेडरद्वारे संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, जपानने अवघ्या सहा मिनिटांत प्रत्युत्तर देत केइतो नाकामुराच्या गोलच्या जोरावर सामना १-१ असा बरोबरीत आणला. (FIFA World Cup 2026)

यानंतर ६४व्या मिनिटाला क्रायसेन्सिओ समरव्हिलने अप्रतिम कर्लिंग शॉट मारत नेदरलँड्सला पुन्हा २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना नेदरलँड्सच्या बाजूने झुकला असल्याचे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जपानच्या दाइची कामादाने कॉर्नरवरून आलेल्या चेंडूवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. (FIFA World Cup 2026)

https://prahaar.in/2026/06/14/deepti-sharma-brilliant-performance-indian-women-resounding-victory-over-pakistan-women-in-the-world-cup-match/

सामन्यानंतर जपानचे प्रशिक्षक हाजिमे मोरियासू यांनी संघाच्या जिद्दीचे कौतुक केले. “बरोबरीने आम्ही पूर्णपणे समाधानी नाही. मात्र नेदरलँड्स हा जागतिक दर्जाचा संघ आहे. आम्ही त्यांच्याशी तोडीस तोड लढलो. खेळाडूंनी संयम राखला आणि शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती दाखवली,” असे त्यांनी सांगितले. (FIFA World Cup 2026)

दुसरीकडे नेदरलँड्सचे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी विजय हुकल्याची खंत व्यक्त केली. “आम्ही जिंकलो नाही याची निराशा आहे. मात्र संघाच्या कामगिरीबाबत मी फारसा नकारात्मक नाही. या संघाने मोठी प्रगती केली आहे. स्पर्धेदरम्यान आम्हाला आणखी सुधारणा करावी लागेल,” असे कोमन म्हणाले. (FIFA World Cup 2026)

सामन्याच्या सुरुवातीलाच नेदरलँड्सने आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या. डोनिएल मालेनने केलेल्या प्रयत्नांवर जपानचा गोलरक्षक झायॉन सुझुकीने शानदार बचाव केला. जपानी चाहत्यांच्या प्रचंड उत्साहामुळे स्टेडियममध्ये वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. (FIFA World Cup 2026)

https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/

या निकालामुळे गट फेरीतील समीकरणे अधिक रंजक बनली असून जपानचा पुढील सामना ट्युनिशियाविरुद्ध होणार आहे. तर गटातील दुसऱ्या सामन्यात स्वीडन आणि ट्युनिशिया आमनेसामने येणार आहेत. (FIFA World Cup 2026)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here