नक्की ट्राय करा हे झटपट तयार होणारे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स

स्प्राउट्स चाट : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळून तयार करा पौष्टिक चाट.

फ्रूट योगर्ट बाउल : दही, हंगामी फळे आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करून तयार करा हेल्दी आणि स्वादिष्ट स्नॅक.

कॉर्न चाट : उकडलेले स्वीट कॉर्न, चाट मसाला आणि लिंबू घालून 5 मिनिटांत तयार होणारा स्नॅक.

व्हेजिटेबल सँडविच : ब्राऊन ब्रेड, काकडी, टोमॅटो आणि पनीर वापरून तयार करा पौष्टिक सँडविच.

रोस्टेड मखाणे : कमी तेलात भाजलेले मखाणे हे प्रोटीन आणि फायबरने भरपूर असतात.

पीनट बटर बनाना टोस्ट : गव्हाच्या ब्रेडवर पीनट बटर आणि केळीचे स्लाइस लावून तयार करा एनर्जी बूस्टर स्नॅक.

ओट्स उपमा : ओट्स आणि भाज्यांपासून बनवलेला हलका, पोटभर आणि पौष्टिक पर्याय.

पनीर टिक्का : कमी मसाल्यात तयार केलेले पनीर टिक्का प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे.