मेक्सिको : सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला स्पेनचा संघ ‘फिफा विश्वचषक २०२६’ जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे, अशी भविष्यवाणी एका नवीन ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सांख्यिकीय मॉडेलने केली आहे. या अत्याधुनिक एआय मॉडेलने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचे तब्बल १ लाख वेळा सिम्युलेशन (डिजिटल सराव सामने) करून हा निष्कर्ष काढला आहे. प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ अचिम झीलेस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासानुसार, स्पेनला विश्वचषक उंचावण्याची १४.५ टक्के संधी (शक्यता) देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/13/fifa-world-cup-2026-legendary-brazilian-footballer-brito-passes-away-on-the-very-second-day-of-the-world-cup/
एआय मॉडेलच्या विश्लेषणानुसार, अव्वल दावेदारांमध्ये युरोपियन संघांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही संघ १२.४ टक्के संधीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. जर्मनी ११.२ टक्के संधीसह जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगाल संघाला ८ टक्के संधी देण्यात आली आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील आणि सध्याचा ‘नंबर १’ असलेला गतविजेता अर्जेंटिनाचा संघ एआयच्या मते ८.२ टक्के संधीसह बराच मागे आहे.
https://prahaar.in/2026/06/13/baloguns-brace-powers-usa-to-a-winning-start-paraguay-routed-4-1/
संशोधकांनी या अंदाजासाठी ‘मशिन लर्निंग’ मॉडेलचा वापर केला. यामध्ये अलीकडची कामगिरी, सट्टेबाजी बाजारातील अंदाज, खेळाडूंची वैयक्तिक गुणवत्ता आणि कौशल्य महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण करण्यात आले. या डेटाच्या आधारे एआयने प्रत्येक सामन्याचे संभाव्य निकाल, गोलची संख्या, एक्स्ट्रा टाईम आणि पेनल्टी शूटआऊट या सर्व गोष्टी गृहीत धरून फिफाच्या नियमांनुसार सामन्यांचे सिम्युलेशन केले.