नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आता देशाचे नवे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ अर्थात लष्करप्रमुख असणार आहेत. राष्ट्रपतींच्या अनुमतीने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची ३० जून पासून चीफ ऑफ आर्मी स्टाफपदी नियुक्ती करण्यात येत आहे. व्हाईस जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील, असे संरक्षण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/06/13/iaf-an-32-crash-in-assam-tragic-crash-of-an-air-force-an-32-aircraft-in-assam-5-personnel-including-the-pilot-martyred-and-the-co-pilot-critically-injured/
लेफ्टनंट सेठी सध्या व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदावर कार्यरत आहेत. यंदा एप्रिल महिन्यात त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. लेफ्टनंट सेठ हे पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८६ मध्ये ते लष्करात रुजू झाले. संघटनात्मक काम, क्षमता विकास प्रशिक्षण, डावपेचात्मक असा ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सेठ यांच्याकडे आहे.
https://prahaar.in/2026/06/13/pakistan-will-not-get-even-a-single-drop-of-water-defence-minister-rajnath-singhs-stern-warning-regarding-the-indus-waters-treaty/
सेठ यांनी वाळवंटी भागात तसेच भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण करणाऱ्या वेस्टर्न थिएटर कमांडचे नेतृत्व केले आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र कॉर्प्स या भारतीय लष्करातील अतिशय प्रतिष्ठेच्या चमूचे नेतृत्व केले. राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय लष्करी कार्यक्रमांचे समन्वयन तसेच संचालन त्यांच्या नेतृत्वात झाले होते. आर्मी कमांडरपदी नियुक्त सेठ यांनी सदर्न वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडची सूत्रे हाताळली. अडीच वर्षाहून अधिक काळ देशाच्या अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाच्या विभागांची दुहेरी जबाबदारी सांभाळण्याचा मान सेठ यांना मिळाला होता.
लष्कराच्या आधुनिकीकरणासंदर्भात सेठ यांनी घेतलेले निर्णय मोलाचे ठरले आहेत. लष्करी शिक्षण कालसुसंगत असावे, यासाठीही त्यांनी हिरिरीने काम केले आहे. नॅशनल डिफेन्स कॉलेजचे विद्यार्थी असलेले सेठ पॅरिस इथल्या कमांड अँड स्टाफ कोर्सचाही भाग होते.