Home ब्रेकिंग न्यूज Elon Musk Trillionaire : एलन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनेअर; संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरवर

Elon Musk Trillionaire : एलन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनेअर; संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरवर

0
Elon Musk Trillionaire : एलन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनेअर; संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरवर
Elon Musk Trillionaire

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्पेसएक्स (SpaceX) कंपनीच्या आयपीओ (IPO) नंतर एलन मस्क यांची एकूण संपत्ती (Net Worth) तब्बल १.१ ट्रिलियन डॉलर इतकी झाली असून ते जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ ठरल्याचा दावा केला जात आहे.

स्पेसएक्सचा आयपीओ अमेरिकेतील नॅस्डॅक (Nasdaq) शेअर बाजारात SPCX या टिकर (Ticker) चिन्हासह सूचीबद्ध (Listing) झाला. या ऐतिहासिक लिस्टिंगनंतर कंपनीच्या मूल्यांकनात (Valuation) मोठी झेप घेतली असून मस्क यांच्या संपत्तीतही विक्रमी वाढ झाली आहे.

https://prahaar.in/2026/06/13/baloguns-brace-powers-usa-to-a-winning-start-paraguay-routed-4-1/

आयपीओमधून ७५ अब्ज डॉलरची उभारणी

स्पेसएक्सने आपल्या आयपीओद्वारे तब्बल ७५ अब्ज डॉलर निधी उभारला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या प्रत्येक शेअरची किंमत १३५ डॉलर निश्चित करण्यात आली होती. लिस्टिंगनंतर कंपनीचे एकूण मूल्यांकन १.७५ ट्रिलियन डॉलर इतके झाल्याचे सांगितले जात आहे. या कामगिरीमुळे स्पेसएक्सचा समावेश जगातील सर्वाधिक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांच्या यादीत झाला आहे. तसेच एलन मस्क यांच्या संपत्तीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे.

सौदी अरामकोचा विक्रम मोडला

स्पेसएक्सच्या आयपीओने यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी Saudi Aramco ने २०१९ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध होताना २९ अब्ज डॉलर निधी उभारला होता. मात्र स्पेसएक्सने ७५ अब्ज डॉलर उभारून हा विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकला आहे.

https://prahaar.in/2026/06/13/mumbai-goa-highway-good-news-for-travelers-major-relief-on-the-mumbai-goa-highway-three-key-bridges-at-sangameshwar-pali-and-lanja-to-open-soon/

गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पेसएक्सच्या समभागांना (Shares) गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. उपलब्ध शेअर्सच्या तुलनेत मागणी चारपटपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी एकूण २५० अब्ज ते ३०० अब्ज डॉलर मूल्याचे शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, कंपनीने आयपीओमधील ३० टक्के हिस्सा रिटेल (Retail) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला होता. सामान्यतः मोठ्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी केवळ ५ ते १० टक्के हिस्सा राखीव असतो. त्यामुळे स्पेसएक्सचा हा निर्णय गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा आणि वेगळा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here