Home ब्रेकिंग न्यूज BMC News : …म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती

BMC News : …म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती

0
BMC News : …म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती
Mumbai Potholes

कंत्राटातील दर कमी करण्यासाठी स्थायी समितीने सहा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले

पश्चिम उपनगरातील खड्डयांच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या मोठ्याप्रमाणात सिमेंट (Cement) काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर पावसाळ्यात (Monsoon) निर्माण होणाऱ्या खड्डयांची समस्या मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. तरीही पावसाळ्यात खड्डयांची तक्रारी (Complaints) प्राप्त झाल्यास खड्डे (Potholes) बुजवून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वर्गवारी करत १४ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यातील कंत्राटदारांनी एका ठिकाणी जास्त उणे दराने तर कुठे कमी उणे दराने बोली लावून मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दुसरीकडे जेवढ्या दरामध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आहे, तेवढ्या दरात काम करून देण्यासाठी दर कमी करण्यासाठी तब्बल सहा प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवून उर्वरीत प्रस्ताव मंजूर केले.

https://prahaar.in/2026/06/13/provide-additional-water-supply-via-tankers-to-settlements-located-at-the-extremities-and-at-higher-elevations/

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) रस्त्यांवरील खराब भागांवर निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक परिमंडळांमध्ये ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आणि ९ मीटर पेक्षा कमी रुंदीचे असे असे वर्गीकरण करून त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदारांनी महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजाच्या तुलनेत १० ते १५ आणि ३० ते ३५ टक्के उणे दराने बोली लावून हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उणे दराने हा प्रस्ताव आल्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत पूर्व उपनगरातील परिमंडळ पाचमधील एल, एम पूर्व व एम पश्चिम विभागातील ९ मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा प्रस्ताव आला असता भाजपचे हरिष भांदिर्गे यांनी याठिकाणी उणे १० टक्के दराने बोली लावून काम मिळवले आहे, याच कंपनीने दुसरीकडे ३० टक्के उणे दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या कंपनीला उणे ३० दरामध्ये हे काम करायला भाग पाडून प्रशासनाने वाटाघाटी करून हा दर कमी करण्यास भाग पाडावे याकरता हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची सूचना केली. ज्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाचले जातील,असे सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला.

त्यानंतर परिमंडळ-५ मधील ‘एल’, ‘एम/पूर्व’ आणि ‘एम/पश्चिम’ विभागातील ९ मिटरपेक्षा कमी लांबीच्या रस्त्यासाठी नियुक्त कंत्राटदार : सीआर शाह,(कंत्राट किंमत : ३.८३ कोटी रुपये), त्यानंतर परिमडळ ६ मधील ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागातील ९ मिटरपेक्षा जास्त(कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : ३.३१ कोटी रुपये)] परिमडळ-६ मधील ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागातील ९ मिटरपेक्षा कमी (कंत्राटदार : सी.आर.शाह, कंत्राट किंमत : ३.१२ कोटी रुपये), परिमडळ-१ मधील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ विभागातील ९ मीटरपेक्षा जास्त(कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.३३ कोटी रुपये)

https://prahaar.in/2026/06/13/maharashtra-weather-news-rainfall-intensity-to-increase-by-the-end-of-june-monsoon-momentum-to-slow-down-thereafter/

परिमंडळ-१ मधील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ विभागातील ९ मीटरपेक्षा कमी (कंत्राटदार : रिओना एंटरप्रायझेस, कंत्राट किंमत : २.०७ कोटी रुपये) हे सर्व प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवून दिले आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील सर्व भाग तसेच शहर भागातील कुलाबा ते भायखळा पर्यंतच्या भागातील रस्त्यांवरील खड्डयांचे प्रस्ताव दर कमी करण्यासाठी फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आहे.

प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना यासर्व कंत्राटदारांची निवड ही पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तथा दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेले आहेत. मंजूर केलेल्या प्रस्तावातील सर्वच रक्कम खर्च होणार नाही. सन २०२३ पूर्वीच्या खड्डयांच्या कामांच्या खर्चाच्या तुलनेत सध्या देण्यात येणारी कामे ही ८० टक्क्यांनी कमी असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here