Home देश  E-Bike Fire : चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक स्कूटर ठरली तिघांच्या मृत्यूचे कारण

 E-Bike Fire : चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक स्कूटर ठरली तिघांच्या मृत्यूचे कारण

0
 E-Bike Fire : चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक स्कूटर ठरली तिघांच्या मृत्यूचे कारण

नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व दिल्लीतील तुघलकाबाद एक्स्टेंशन परिसरात आज (दि.१२) पहाटे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले असून, त्याच ठिकाणी चार्जिंगला लावलेली ई-स्कूटर असल्याने आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.

https://prahaar.in/2026/06/12/24-candidates-elected-unopposed-in-rajya-sabha-polls-nda-on-the-verge-of-a-two-thirds-majority-in-the-upper-house-of-parliament/

तुघलकाबाद एक्स्टेंशनमधील पाच मजली इमारतीत गुरुवारी मध्यरात्री २.२४ वाजता आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरातील रस्ते आणि गल्ल्या अतिशय अरुंद असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, वरिष्ठ अधिकारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत २८ वर्षीय पंकज, त्याची आई गुड्डी आणि बहीण सोनी यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर पंकज याची आजी आणि दुसरी बहीण मोनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://prahaar.in/2026/06/12/us-pressure-but-india-stands-firm-refuses-to-send-troops-for-hormuz-mission/

प्राथमिक चौकशीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. याच ठिकाणी एक इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावलेली होती. आग लागल्यानंतर काही क्षणांतच ती वेगाने पसरली आणि तेथे उभ्या असलेल्या सात दुचाक्यांना आगीने वेढले. वाहनांच्या पेट्रोल टाक्या फुटल्याने आणि प्लास्टिक जळल्याने संपूर्ण इमारतीत काळा, विषारी धूर पसरला. त्यामुळे वरच्या मजल्यांवर झोपलेल्या रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.अग्निशमन दल आणि पोलिसांनी धुराच्या प्रचंड लोटांमध्ये अडकलेल्या आठ जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट आणि चार्जिंगवरील ई-स्कूटर हे संभाव्य कारण दिसत असले तरी नेमके कारण फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here