Home महाराष्ट्र कोकण Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’

0
Coronation of Shivaji Maharaj :  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला प्रशासनाने वेग दिला असून सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, विविध विभागांचे अधिकारी तसेच कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/12/electric-scooter-left-charging-caused-the-deaths-of-three-people/

मंत्री गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे.सोहळ्यादरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन व्यवस्था, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्ट्रेचर, औषधसाठा आणि सर्पदंशावरील उपचारांची व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देशही दिले.जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, सोहळ्याच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून सुरक्षा, आरोग्य, परिवहन, पाणीपुरवठा, स्वच्छता, खानपान, मंडप, शौचालय व्यवस्था आणि राजशिष्टाचार यांचे नियोजन सुरू आहे. शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून समितीनिहाय कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here