Home ताज्या घडामोडी Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

0
Sejal Pawar Controversy Video:  प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: ‘बिग बॉस’ फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (Sejal Pawar Controversy Video)

व्हिडिओमध्ये प्रणीत मोरे प्रेक्षकांशी संवाद साधत असताना त्यांनी शवविच्छेदन किंवा शरीरशास्त्राच्या अभ्यासादरम्यान डॉक्टर गंभीर असतात की विनोद करतात, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना डॉ. सेजल पवार यांनी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये मृतदेहांच्या अवयवांबाबत विनोद होत असल्याचे सांगितले. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

https://prahaar.in/2026/06/11/allegation-of-sexual-assault-on-a-minor-girl-action-taken-against-the-chairmans-brother/

दरम्यान, डॉ. सेजल पवार या मुंबईतील केईएम रुग्णालयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या वादावर त्यांची किंवा संबंधित संस्थेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. सोशल मीडियावरील चर्चेमुळे हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माफी मागितली आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अनेक कुटुंबे आपल्या प्रियजनांचे मृतदेह दान करतात. अशा दान केलेल्या मृतदेहांबाबत सार्वजनिकरित्या अशा प्रकारच्या टिप्पणी करणे हे वैद्यकीय नैतिकतेच्या विरोधात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

https://prahaar.in/2026/06/11/eighth-hearing-on-kadlagas-bail-plea-today/

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून, वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये शिकवले जाणारे नैतिक मूल्य, मृतदेहांविषयी आदर आणि व्यावसायिक जबाबदारी यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींनी संबंधित डॉक्टरकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे, तर काहींनी हा संवाद विनोदाच्या संदर्भात घेतला गेला असला तरी तो संवेदनशील विषय असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here