Home ब्रेकिंग न्यूज Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या ‘लँड जिहाद’वर प्रहार

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या ‘लँड जिहाद’वर प्रहार

0
Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या ‘लँड जिहाद’वर प्रहार
Mankhurd, Children's Aid Society,

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड परिसरातील शासकीय आणि संवेदनशील जमिनींवर बांगलादेशी भूमाफियांनी केलेल्या ‘लँड जिहाद’ विरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील तब्बल १४ एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली गोदामे आणि अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या आदेशानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ही संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात केली आहे.

https://prahaar.in/2026/06/11/only-25-water-stock-remains-in-the-state/

या संदर्भातील कारवाईची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली असून, मानखुर्द लिंक रोडवर भूमाफियांनी बळकावलेल्या १४ एकर जागेवरील बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अतिक्रमित जागेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास आणि टाटा पॉवरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महामार्गालगत नव्याने उभारली जाणारी बेकायदेशीर गोदामे, गॅस पाईपलाईन आणि टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले अनधिकृत व्यवसाय तात्काळ हटवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते.

https://prahaar.in/2026/06/11/on-your-birthday-plant-trees-and-create-water-sources-instead-of-putting-up-hoardings/

मुंबई महानगरपालिकेला ‘एमआरटीपी’ कायद्यांतर्गत कारवाई वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले असून, या बेकायदेशीर गोदामांना मिळालेले व्यावसायिक परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीज आणि पाणीजोडण्यांची कसून तपासणी करून त्या तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, सिटी सर्व्हे विभागामार्फत या शासकीय जमिनींचे तातडीने मोजमाप करून अधिकृत सीमा निश्चित करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. ही मोहीम पूर्ण करून ही मौल्यवान जागा ‘चिल्ड्रन्स एड सोसायटी’च्या मूळ उद्देशासाठी दिली जाणार असून, भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here