Home क्रीडा FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६, महासंग्राम भारतात शुक्रवारपासून दिसणार

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६, महासंग्राम भारतात शुक्रवारपासून दिसणार

0
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६, महासंग्राम भारतात शुक्रवारपासून दिसणार
fifa2026

Mexico : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फिफा विश्वचषक २०२६ या फुटबॉलच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. प्रथमच ४८ संघ, १०४ सामने आणि तीन देशांमध्ये रंगणारी ही स्पर्धा फुटबॉल इतिहासातील सर्वात भव्य विश्वचषक ठरणार आहे. मेक्सिको सिटी येथे यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होणार असून जगभरातील अब्जावधी चाहत्यांचे लक्ष या महासंग्रामाकडे लागले आहे.यंदाच्या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. गतविजेता अर्जेंटिना आणि त्यांचा कर्णधार मेस्सी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने संघाच्या आशा उंचावल्या आहेत. दुसरीकडे, ४० वर्षीय रोनाल्डो पोर्तुगालला पहिले विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.

यंदाच्या विश्वचषकात फ्रान्स, इंग्लंड, अर्जेंटिना, स्पेन, ब्राझील, पोर्तुगाल आणि जर्मनी हे प्रमुख विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत. तर इक्वेडोर, बेल्जियम, मोरोक्को आणि उरुग्वे हे संघ मोठे धक्के देऊ शकतात.विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे गोल्डन बूटची शर्यत. २०२२ मध्ये आठ गोल करत गोल्डन बूट पटकावणारा फ्रान्सचा सुपरस्टार किलियन एम्बाप्पे पुन्हा एकदा आघाडीचा दावेदार मानला जात आहे. त्याने आतापर्यंत १४ विश्वचषक सामन्यांत १२ गोल केले आहेत. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन दुसऱ्यांदा गोल्डन बूट जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. २०१८ मध्ये त्याने सहा गोल करत हा किताब जिंकला होता.स्पेनचा मिकेल ओयार्झाबाल, नॉर्वेचा गोलमशीन एर्लिंग हालांड, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, स्पेनचा युवा स्टार लामिन यामाल, फ्रान्सचा उस्मान डेंबेले तसेच ब्राझीलचे विनिसियस ज्युनियर आणि राफिन्हा हेही गोल्डन बूटच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार आहेत.

विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी यजमान मेक्सिकोसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरिया आणि झेक प्रजासत्ताक आमनेसामने येतील. गट फेरीपासूनच अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार असून प्रत्येक गुणासाठी संघांमध्ये चुरस रंगणार आहे.फुटबॉलप्रेमींसाठी ही स्पर्धा केवळ खेळ नाही, तर भावना, इतिहास आणि स्वप्नांची लढाई आहे. मेस्सी-रोनाल्डोच्या अखेरच्या विश्वचषकातील जादू, एम्बाप्पे-हालांडची गोलांची बरसात आणि नव्या विश्वविजेत्याच्या शोधामुळे पुढील काही आठवडे संपूर्ण जग फुटबॉलमय होणार आहे.


अब्जावधी डॉलरची उलाढाल

आर्थिकदृष्ट्याही हा विश्वचषक विक्रमी ठरणार आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अंदाजानुसार स्पर्धेमुळे सुमारे ८० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होणार आहे. फिफालाही यंदाच्या चार वर्षांच्या चक्रात सुमारे १३ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, जे यापूर्वीच्या सर्व स्पर्धांपेक्षा अधिक आहे.

गोल्डन बूटचे प्रमुख दावेदार
किलियन एम्बाप्पे (फ्रान्स)
हॅरी केन (इंग्लंड)
एर्लिंग हालांड (नॉर्वे)
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
मिकेल ओयार्झाबाल (स्पेन)
लामिन यामाल (स्पेन)
उस्मान डेंबेले (फ्रान्स)
विनिसियस ज्युनियर (ब्राझील)
राफिन्हा (ब्राझील)

आजचे सामने

गट अ
मेक्सिको वि. दक्षिण आफ्रिका
दक्षिण कोरिया वि. झेक प्रजासत्ताक

विजेतेपदाचे प्रमुख दावेदार

अर्जेंटिना
फ्रान्स
इंग्लंड
स्पेन
ब्राझील
पोर्तुगाल
जर्मनी

https://prahaar.in/2026/06/10/navy-to-get-advanced-gnss-jammer-ministry-of-defence-signs-%e2%82%b9449-crore-contract/

लक्ष ठेवण्यासारखे ‘डार्क हॉर्स’

इक्वेडोर
मोइसेस कैसेदो
विलियन पाचो
केंड्री पाएझ
एनर व्हॅलेन्सिया
बेल्जियम
केविन डी ब्रुयने
जेरमी डोकू
थिबॉ कोर्त्वा
लिअँड्रो ट्रोसार्ड

https://prahaar.in/2026/06/10/ind-vs-afg-has-manav-suthars-luck-turned-after-his-historic-debut-a-chance-to-play-for-a-foreign-team/

विश्वचषक २०२६ एका नजरेत

यजमान देश : अमेरिका, कॅनडा, मेक्सिको
सहभागी संघ : ४८
एकूण सामने : १०४
स्टेडियम : १६
शहरं : १६
उद्घाटन : ११ जून २०२६
अंतिम सामना : अमेरिकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here