Home क्रीडा IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

0
IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारताच्या युवा डावखुऱ्या फिरकीपटू मानव सुथारला मोठी संधी मिळाली आहे. दमदार कामगिरीनंतर मानवला आता इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबत (Warwickshire County Cricket Club) अल्पकालीन करार केला आहे.

https://prahaar.in/2026/06/10/devendra-fadnavis-the-journey-from-a-capable-india-to-a-developed-india-is-possible-only-because-of-prime-minister-modi/

इंग्लंड क्रिकेटमध्ये खेळणार ?

मानव सुथार प्रथमच काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंडमधील वॉरविकशायर क्लबने अधिकृत निवेदनात सांगितले की,मानव पुढील दोन फेऱ्यांसाठी संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.काउंटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या वॉरविकशायरला मानवकडून मोठ्या अपेक्षा आहेत.मानव सुथार 12 ते 15 जूनदरम्यान यॉर्कशायरविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर तो समरसेटविरुद्धच्या सामन्यातही संघाकडून मैदानात उतरू शकतो.

https://prahaar.in/2026/06/10/chandrashekar-bawankule-separate-ready-reckoner-rates-now-for-skyscrapers-and-slums/

देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार आकडे

मूळचा राजस्थानचा असलेला मानव सुथार आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने १३६ विकेट्स आणि ९७३ धावा केल्या आहेत. त्याने सात डावात पाच विकेट्स मिळवल्या आहेत. तीन वेळा त्याने सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक देखील आहे.भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दोऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन सामने खेळले जाणार आहेत. हे दोनही सामने ICC World Test Championship चा भाग असणार आहेत. यामुळे हे सामने ICC TEST RANKING च्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय पदार्पणानंतर मानव सुथारने श्रीलंका दौऱ्यासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.पदार्पण कसोटीत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटची संधी यामुळे मानव सुथारची कारकीर्द सध्या वेगाने उंच भरारी घेताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here