नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच वाढ झाल्यानंतर आता भविष्यात गॅस सिलेंडर आणखी महाग होण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एलपीजीच्या किंमतींवर मोठा दबाव निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. (LPG Price Hike)
https://prahaar.in/2026/06/09/victory-for-mahadev-devotees-the-dispute-over-the-land-of-pimpleshwar-temple-has-been-resolved-chief-minister-devendra-fadnavis-big-announcement/
जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी कोलमडली :
दरवाढीमागील कारण स्पष्ट करताना प्रल्हाद जोशी म्हणाले, “गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही दुःख होते. मात्र, सध्या जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे आणि वाहतुकीतील अडचणींमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.” (LPG Price Hike)
सरकारचा नाईलाज, जनतेची चिंता :
“सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत सरकार तितकेच संवेदनशील आहे. मात्र, जागतिक परिस्थिती आणि वाढलेले खर्च लक्षात घेता काही निर्णय घेणे अपरिहार्य ठरत आहे,” असेही जोशी यांनी स्पष्ट केले. (LPG Price Hike)
https://prahaar.in/2026/06/08/urgently-improve-the-current-condition-of-opds-and-toilets-in-municipal-hospitals/
७ जूनला २९ रुपयांची वाढ :
दरम्यान, ७ जून रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी व्यावसायिक वापराच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. आता घरगुती सिलेंडरचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गृहिणींसह सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (LPG Price Hike)