Home ब्रेकिंग न्यूज फिलीपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

फिलीपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

0
फिलीपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप
Magnitude,

मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून, यामध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. फिलीपिन्सच्या नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्थानिक नागरी संरक्षण कार्यालयाचे संचालक रॉड्रिगो सोसमेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मृतांपैकी १२ जणांचा मृत्यू एकट्या ‘सोक्ससारजेन’ या चार प्रांत आणि एका शहराचा समावेश असलेल्या भागात झाला आहे. यामध्ये दक्षिण कोटाबाटो, सुलतान कुदरात, सारंगानी आणि जनरल सँटोस सिटी या भागांचा समावेश आहे. याच भागात १२९ हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

https://prahaar.in/2026/06/08/14-rebel-mps-of-trinamool-congress-on-their-way-to-bjp/

फिलीपिन्सच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सोशल वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट’चे सचिव रेक्स गॅचलियन यांनी स्थानिक प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित कुटुंबांसाठी मिंदानाओ भागात तब्बल ११ लाख ‘फॅमिली फूड पॅक्स’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी देशभरात एकूण ४७ लाख अन्न पाकिटे आधीच सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यात आली आहेत, जी तातडीने वितरित केली जात आहेत. प्रभावित भागात मोबाईल कमांड सेंटर्स, मोबाईल किचन आणि इतर आवश्यक उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले की, नागरी संरक्षण कार्यालय आणि राष्ट्रीय आपत्ती जोखीम नियंत्रण व व्यवस्थापन परिषदेसह सर्व आपत्कालीन यंत्रणांना तत्काळ सक्रिय करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/06/08/sanjay-nirupan-on-tcs-issue/

९ प्रांत रिकामे करण्याचे आदेश
भूकंपानंतर समुद्रामध्ये धोकादायक लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जपान, फिलीपिन्स आणि इंडोनेशिया या देशांनी त्सुनामीचा सतर्कतेचा इशारा जारी केला होता. अमेरिकेतील ‘पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने दिलेल्या माहितीनुसार, फिलीपिन्सच्या किनारपट्टीवर ३ मीटर (सुमारे ९.८ फूट) उंचीच्या, तर इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही भागांत १ मीटरपर्यंतच्या त्सुनामी लाटा धडकण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, फिलीपिन्स प्रशासनाने सारंगानी, दाव्हाओ ऑक्सिडेंटल, तावी-तावी आणि सुलू यांसह ९ प्रांतांमधील किनारपट्टीवरील नागरिकांना तात्काळ उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते.

शेजारील देशांमध्येही हाय-अलर्ट
या भूकंपाचे धक्के इंडोनेशियापर्यंत जाणवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी, उत्तर गोरोन्तालो प्रांत आणि सँगीहे बेटांवरील रहिवाशांना देखील किनारपट्टी सोडून उंचावर जाण्यास सांगण्यात आले आहे. फिलीपिन्स राष्ट्रीय पोलीस आणि इतर मदत यंत्रणा सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

https://prahaar.in/2026/06/08/meghna-sakore-bordikar-on-mahavitaran/

भूतानमध्ये ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
भूतान (वृत्तसंस्था): भारतचा शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये रविवारी (७ जून) रात्री उशिरा ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भारताच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ने या भूकंपाची नोंद केली असून यासंबंधीची अधिकृत माहिती दिली आहे. ‘एनसीएस’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली २६ किलोमीटर खोलीवर होता.मुख्य भूकंपानंतर काही मिनिटांच्या अंतराने भूतानमध्ये अनेक ‘आफ्टरशॉक्स’ (भूकंपानंतरचे सौम्य धक्के) देखील नोंदवले गेले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहिला धक्का रात्री ११:१८ वाजता २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला, ज्याची खोली २२ किमी होती. दुसरा धक्का रात्री ११:५२ वाजता २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला, ज्याची खोली १८ किमी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here