Home ताज्या घडामोडी Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

0
Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी
Jalgaon Accident

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. मोरवंडे परिसरातील सुरभी हॉटेलजवळ एका अल्टो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

https://prahaar.in/2026/06/08/jalna-bribery-case-plans-foiled-before-they-could-even-take-off-acb-raids-jalna-tehsildars-residence/

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. मोरवंडे परिसरात पोहोचल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दरीत जाऊन पडली. अपघाताचा जोर इतका होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते आणि आपत्कालीन मदत पथकाच्या सदस्यांनी दरीत उतरून बचावकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनीही मदत केली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जवळील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. वैद्यकीय पथकाने जखमींना प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/06/08/philippines-earthquake-philippines-shaken-tsunami-warning-issued-after-7-8-magnitude-earthquake-in-the-philippines/

या अपघातात सिद्धी नाईक, रिद्धी नाईक, स्नेहल नाईक, सिद्धेश नाईक आणि तेजस बोरकर हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण मुंबई आणि ठाणे परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर काही काळ महामार्गावर नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here