Home ब्रेकिंग न्यूज Philippines Earthquake : फिलीपिन्स हादरलं! फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने त्सुनामीचा इशारा जारी

Philippines Earthquake : फिलीपिन्स हादरलं! फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने त्सुनामीचा इशारा जारी

0
Philippines Earthquake : फिलीपिन्स हादरलं! फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने त्सुनामीचा इशारा जारी

फिलीपिन्स : फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील मिंडानाओ भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी नोंदवण्यात आली असून, त्यानंतर अनेक किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Philippines Earthquake)

या भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तसेच नागरिकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Philippines Earthquake)

फिलिपाइन्स ज्वालामुखी आणि भूकंप विज्ञान संस्था (पीएचआयव्हीओएलसीएस) यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र मिंडानाओ बेटावरील जनरल सँटोस शहराच्या नैऋत्येस सुमारे १३ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३७ वाजता हा भूकंप झाला असून, संपूर्ण परिसरात तीव्र धक्के जाणवले. (Philippines Earthquake)

https://prahaar.in/2026/06/08/dadar-bus-accident-horrific-accident-in-dadar-speeding-bus-wreaks-havoc-3-bike-taxi-and-ola-uber-hit-one-dead-many-injured/

भूकंपानंतर तात्काळ अमेरिकेच्या सुनामी इशारा प्रणालीने संभाव्य सुनामीचा इशारा जारी केला. त्यानंतर इंडोनेशियाच्या भूभौतिकी संस्थेने देखील आपल्या ईशान्य किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला. पीएचआयव्हीओएलसीएसने इशारा दिला आहे की प्रभावित किनारी भागांमध्ये सामान्य भरतीच्या पातळीपेक्षा एक मीटरहून अधिक उंच लाटा उसळू शकतात. या लाटांचा परिणाम अनेक तास कायम राहू शकतो. (Philippines Earthquake)

फिलिपाइन्स भूकंप संस्थेचे प्रमुख तेरेसिटो बाकोलकोल यांनी किनारी भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी किंवा उंच भागांमध्ये स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, मदत आणि बचाव पथकांना सतर्क करण्यात आले आहे. (Philippines Earthquake)

https://prahaar.in/2026/06/08/chitra-wagh-chitra-wagh-is-aggressive-on-the-outrageous-case-in-dahanu-demands-strict-action-in-the-case-of-torture-on-two-sisters/

दरम्यान भूकंपाचे धक्के केवळ फिलिपाइन्सपुरते मर्यादित राहिले नाहीत. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतांमध्येही कंपन जाणवले. याशिवाय तैवान, जपान, गुआम, पापुआ न्यू गिनी तसेच पश्चिम प्रशांत महासागरातील अनेक बेट राष्ट्रांमध्येही सौम्य धक्के जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Philippines Earthquake)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here