Home देश NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

0
NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप जाहीर केली आहे. नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षा देत असलेला प्रत्येक विद्यार्थी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून शहर सूचना स्लिप तपासू आणि डाऊनलोड करू शकतो. उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र जाणून घेऊन आवश्यक प्रवासाचे नियोजन करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप जाहीर केली आहे. ही स्लीप म्हणजे परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉलतिकीट नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सी हॉलतिकीट लवकरच ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे.नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षा भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि देशाबाहेरील १४ शहरांमध्ये लेखी (पेन-अँड-पेपर) पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा रविवार, २१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५:१५ या वेळेत होईल. परीक्षेच्या वेळेत परीक्षेशी संबंधित औपचारिक कामांसाठीचा वेळ पण समाविष्ट आहे.

परीक्षा शहर सूचना स्लिप परीक्षा देत असलेल्यांना त्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याबद्दल माहिती देते. उमेदवार अधिकृत पोर्टलवर त्यांच्या अर्जाच्या माहितीसह लॉग इन करून शहर सूचना स्लिप तपासू आणि डाऊनलोड करू शकतात.परीक्षेशी संबंधित इतर माहिती neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवरच लवकरच दिली जाणार आहे.शहर सूचना स्लिप डाउनलोड करताना काही अडचण आल्यास, उमेदवार NTA हेल्पलाइन क्रमांक 011-40759000 किंवा 011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा neetug2026@nta.ac.in वर ईमेल करू शकतात .

नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप कशी डाऊनलोड करावी ?

कृती

neet.nta.nic.in वर जा

NEET UG 2026 परीक्षा शहर सूचना स्लिप लिंकवर क्लिक करा

आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स देऊन लॉग इन करा

भविष्यातील संदर्भासाठी सिटी स्लिप डाउनलोड करून जतन करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here