Home क्राईम Pune Crime : संसारात रमलेल्या चार जणींनी एकाच कारणासाठी संपवलं स्वतःचं आयुष्य

Pune Crime : संसारात रमलेल्या चार जणींनी एकाच कारणासाठी संपवलं स्वतःचं आयुष्य

0
Pune Crime : संसारात रमलेल्या चार जणींनी एकाच कारणासाठी संपवलं स्वतःचं आयुष्य
crime news

पुणे : पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं आणि याच शहरात वाढत्या गुन्हेगारी, महिला असुरक्षितता, सायबर क्राईम सारख्या समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या तीन दिवसांत पुणे शहरात माणुसकीला आणि नात्यांना काळीमा फासणारा घटनाक्रम घडला आहे. चार वेगवेगळ्या भागात ४ विवाहित महिलांनी गळफास घेऊन किंवा विष प्राशन करून आपलं जीवन संपवले आहे.विशेष म्हणजे ह्या चारही महिलांचे टोकाचा निर्णय घेण्याचे कारण हे एकसारखेच आहे.

कारण काय आहे ?

पती आणि सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलांनी टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले आहे. सतत होणाऱ्या मानसिक , शारीरिक, आर्थिक त्रासाला त्या कंटाळल्या होत्या. पती आणि सासरच्या मंडळींची ‘पैशांची आणि हुंड्याची’ मागणी तब्बल चार सुखी संसार उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरली आहे.या धक्कादायक घटनांमुळे पुणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. चंदननगर, वाघोली, कोंढवा आणि आंबेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत या महिलांच्या पतींसह सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या तीन – चार दिवसांत घडलेल्या या गंभीर घटनांनी पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

https://prahaar.in/2026/06/07/cyber-crime-news/

कोण आहेत त्या चार महिला ?

१) पहिली महिला : दि.३ जून , तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५)चंदननगर येथील तुकारामनगर ह्या परिसरामध्ये राहत होती.कार आणि नवीन घर खरेदी करण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होते.पैसे न आणल्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. त्रासाला कंटाळून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पती गोरख संभाजी सोनवणे याला अटक केली असून, सासू-सासऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.

२) दुसरी महिला : दि.१ जून , प्रियांका गणेश कांबळे (वय २५) वाघोली परिसरात राहत होती.पतीने सतत केलेल्या पैशांच्या मागणीमुळे ती प्रचंड तणावात होती. या तणावात प्रियांकाने घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पती गणेश दिगंबर कांबळे याला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

https://prahaar.in/2026/06/07/traffic-jam-on-mumbai-gujarat-highway-gas-tanker-overturns/

३) तिसरी महिला : दि.३१ मे, एजाज कुरेशी ताडे (वय २१) कोंढवा खुर्द येथील साईबाबानगर परिसरामध्ये वास्तव्यास होती.लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा न दिल्याने सासरच्या छळाला ती सामोरी जात होती. छळाला कंटाळून तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्या प्रकरणात पती एजाज कुरेशी ताडे याला अटक केली असून कुटुंबातील इतर ३ महिलांवर गुन्हा नोंदवला आहे.

४) चौथी महिला : आंबेगाव परिसरात राहत होती. यात एका २० वर्षीय तरुणीने मोठ्या आशेने प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्न झाल्यावर काही दिवसांतच तिच्याकडे हुंड्याची मागणी करत सासरच्यांनी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून अखेर या तरुणीने तिने कीटकनाशक (विष) प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पती अजित दशरथ पवार, सासू आणि नणंदेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here