https://prahaar.in/2026/06/07/bandra-garib-nagar-renovation/
नेमका प्रकार काय घडला?
ही घटना २६ मार्च ते ३ जून २०२६ या कालावधीत घडली. तक्रारदार घरी असताना त्यांना परस्पर ‘IIFL Invesco VII 2026 10x Growth Strategy Y113’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. आर. वेंकट रमण आणि टिना मल्होत्रा या नावाने वावरणाऱ्या भामट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
https://prahaar.in/2026/06/07/iran-america-war-spark-of-war-again-in-the-middle-east-america-attacks-iran-missile-alert-in-kuwait-bahrain/
फसवणुकीचे ‘जाळे’ कसे विणले?
बनावट कागदपत्रे: आरोपींनी ‘IIFL Capital’च्या नावाने भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे (SEBI) बनावट प्रमाणपत्र दाखवून गुंतवणुकीची स्कीम कायदेशीर असल्याचा विश्वास दिला.
भ्रामक ॲप: गुंतवणुकीसाठी त्यांना ‘IFLVIP’ नावाचे एक संशयास्पद ॲप डाऊनलोड करायला लावले. या ॲपवर गुंतवणूकदाराला त्यांच्या रक्कमेवर मोठा नफा होत असल्याचे खोटे आकडे दाखवून त्यांना भूलवण्यात आले.
फसवणुकीचा धक्का: जेव्हा तक्रारदाराला त्यांच्या मूळ गुंतवणुकीची रक्कम आणि नफा परत हवा होता, तेव्हा त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सायबर पोलिसांचा इशारा: या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत असून, फसवणूक करणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन, बनावट ॲप निर्माते आणि ज्या खात्यांवर पैसे वळवण्यात आले त्या खातेधारकांचा शोध घेतला जात आहे.