मुंबई : महापालिकेच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावरील भाभा रुग्णालयाजवळील आरोग्याबाबत आरक्षित असलेल्या भूखंडावर नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हे नर्सिंग महाविद्यालय पीपीपी अर्थात खासगी सहभाग तत्वावर विकसित करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे नर्सिंग महाविद्यालय महापालिकेने स्वत: उभारावे अशी मागणी होत असतानाच महापालिका आरोग्य विभाग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
https://prahaar.in/2026/06/06/old-building-is-it-the-consultants-game-behind-showing-old-buildings-as-extremely-dangerous/
के.बी.भाभा रुग्णालय वांद्रे (प) येथील भूमापन क्र. १०७६ एमपी ८९, पार्ट क्र १ हा भूखंड आरोग्य विषयक बाबींसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. या जागेवर नर्सिंग महाविदयालय सुरु करण्याकरीता मुख्यमंत्री तसेच पालकंत्री यांच्याशी महानगरपालिका आयुक्त यांनी केलेल्या चर्चानुसार हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी सहभाग प्रकल्पांतर्गत (पीपीपी) विकसित करण्याबाबत व निविदा मागविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांनी निर्देश दिलेले आहे. त्यानुसार निविदाबाबतची प्रक्रिया करण्यात आलेली असल्याचे भाभा रुग्णालयाने स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/06/06/multi-tunneling-mumbai-a-network-of-tunnels-will-be-built-in-mumbai-expected-cost-of-rs-4392-crores/
याबाबत मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये त्यांनी वांद्रे (पश्चिम) येथे आर. के. पाटकर मार्गवर भूमापन क्र. १०७६, एमपी ८९, पार्ट क्र.१, मुंबई ५० येथे महानगरपालिकेचा भूखंड असून हा भूभाग आरोग्य विषयक बार्बीसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. पण त्या भूखंडावर महानगरपालिकेने नर्सिंग महाविदयालय बांधण्याकरीता निविदा काढली आहे. ही निविदा जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांनी भरली. हा भूखंड तीस वर्षासाठी रुपये पाच कोटी एकोणतीस लाख एवढया किंमतीने भाडयावर दिला जात आहे. त्यामध्ये चाळीस टक्के जागा या महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. महानगरपालिकेची स्वतःची रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविदयालय आहेत. परिचारीकेचा डिप्लोमा कोर्सही महानगरपालिकेच्या रुग्णालयामार्फत देण्यात येतो. मग परिचारीका डीग्री कोर्स महानगरपालिकाअसे भूखंड खाजगी संस्थांना न देता स्वतःच परिचारीका महाविदयालय चालवावे. जेणेकरुन मराठी मुलींना संधी मिळेल अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु महापालिका आरोग्य विभाग पीपीपीवर आधारीत नर्सिंग महाविद्यालय उभारण्यावर आग्रही असल्याचे दिसून येत आहे.