Home क्राईम Pune Crime:  घर आवरताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पुण्यात महिलेचे ११ लाखांचे दागिने गायब

Pune Crime:  घर आवरताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पुण्यात महिलेचे ११ लाखांचे दागिने गायब

0
Pune Crime:  घर आवरताना उघड झाला धक्कादायक प्रकार; पुण्यात महिलेचे ११ लाखांचे दागिने गायब

पुणे: पुण्यातील (Pune Crime) एका कुटुंबाला घरातील वस्तू आवरताना मोठा धक्का बसला आहे. कपाटातील दागिने तपासताना लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात चोरीचा गुन्हा (Case of theft) दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय महिला आळंदी रोड परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. त्यांच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून एक महिला घरकामासाठी येत होती. घरातील साफसफाई आणि इतर कामांमुळे तिला घरातील विविध खोल्यांमध्ये जाण्याची मुभा होती.

https://prahaar.in/2026/06/05/how-much-weight-does-rebel-gokul-gite-from-nashik-carry/https://prahaar.in/2026/06/05/how-much-weight-does-rebel-gokul-gite-from-nashik-carry/

दरम्यान, घरातील कपाट आवरत असताना महिलेच्या लक्षात आले की, काही सोन्याचे दागिने जागेवर नाहीत. सुरुवातीला तिला याबाबत शंका आली. त्यानंतर तिने घरातील सर्व दागिन्यांची तपासणी केली असता मोठी चोरी झाल्याचे उघड झाले. तपासणीनंतर सुमारे ११ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आले.

महिलेने घरातील परिस्थितीचा आढावा घेतला असता, संबंधित कालावधीत घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे येणे-जाणे झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिचा संशय थेट घरकाम करणाऱ्या महिलेवर गेला.

घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित महिलेविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक तपासात काही दिवसांच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरू असून चोरीला गेलेले दागिने जप्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here