पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी विप्रोबाबतही एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. कंपनीच्या पुणे कार्यालयातील एका माजी महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर धार्मिक छळ, मानसिक त्रास आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Wipro Office Religious Harassment)
https://prahaar.in/2026/06/04/shrirampur-ats-raid-pakistani-gangsters-social-media-network-enters-maharashtra-ats-conducts-major-operation-in-shrirampur-four-arrested/
धार्मिक विश्वासांमुळे लक्ष्य केल्याचा आरोप :
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पुण्यातील हिंजवडी येथील विप्रो कार्यालयात कार्यरत असताना काही वरिष्ठ व्यवस्थापक आणि टीम लीडर्सकडून तिच्या धार्मिक श्रद्धांमुळे तिला लक्ष्य केले जात होते. तिने आरोप केला आहे की, तिला एका विशिष्ट धर्माचा स्वीकार करण्यासाठी आणि त्या धर्मातील प्रथा पाळण्यासाठी सातत्याने मानसिक दबाव टाकण्यात येत होता. महिलेच्या तक्रारीनुसार, तिने या दबावाला विरोध केल्यानंतर तिच्यावरील वागणूक अधिक कठोर झाली आणि कार्यस्थळी तिचा छळ वाढवण्यात आला. (Wipro Office Religious Harassment)
खराब परफॉर्मन्स रिव्ह्यूची धमकी :
तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, वरिष्ठांकडून तिला वारंवार खराब परफॉर्मन्स रिव्ह्यू देण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. सततच्या मानसिक तणावामुळे आणि कथित छळामुळे अखेर तिला नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. महिलेने कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडेही या प्रकरणाची तक्रार केली होती. मात्र, तेथून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने तिने कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Wipro Office Religious Harassment)
https://prahaar.in/2026/06/04/on-one-hand-trying-to-be-a-peace-envoy-on-the-other-hand-closeness-to-an-enemy-country-did-pakistan-provide-secret-information-about-iran-to-the-us/
पोलिस आणि मानवाधिकार आयोगाकडे धाव :
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता संबंधित महिलेने स्थानिक पोलिस प्रशासनासोबतच मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ई-मेल संवाद, कार्यालयीन नोंदी आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. (Wipro Office Religious Harassment)