Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : नाशिकमध्येही बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट ? किरीट सोमय्यांची महापालिका प्रशासनाला चौकशीची मागणी

Nashik News : नाशिकमध्येही बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट ? किरीट सोमय्यांची महापालिका प्रशासनाला चौकशीची मागणी

0
Nashik News : नाशिकमध्येही बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट ? किरीट सोमय्यांची महापालिका प्रशासनाला चौकशीची मागणी

नाशिक : मालेगाव आणि नंदुरबारमध्ये उघडकीस आलेल्या बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणानंतर आता नाशिकमधील जन्म-मृत्यू नोंदींवरही (Birth and death certificate) संशयाची छाया पडली आहे. शहरात अशा प्रकारचे गैरप्रकार घडले आहेत का, याचा सखोल शोध घेऊन संशयास्पद नोंदींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे केली. आज गुरुवारी किरीट सोमय्या यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त खत्री यांची भेट घेऊन या संवेदनशील विषयावर चर्चा केली.

https://prahaar.in/2026/06/04/another-builder-bomb-in-nashik/

किरीट सोमय्या यांची मागणी काय ?

जन्म-मृत्यू दाखल्यांमधील (Birth and death certificate) दुरुस्तीच्या नावाखाली गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद करत सोमय्या म्हणाले की, अशा प्रत्येक अर्जाची मूळ कागदपत्रांच्या आधारे काटेकोर पडताळणी झाली पाहिजे. तपासणीत कुठलीही संशयास्पद नोंद आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. दरम्यान, महापालिका प्रशासन लवकरच जन्म-मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन करण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेदरम्यान जुन्या व नव्या सर्व नोंदींची बारकाईने तपासणी करूनच डिजिटल रेकॉर्ड तयार करावेत, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

https://prahaar.in/2026/06/04/supply-inspector-at-dhule-tehsil-office-caught-by-acb/

विशेष म्हणजे, शहरातील बोगस जन्म-मृत्यू नोंदींच्या संभाव्य गैरव्यवहाराबाबत सोमय्या यांचा हा पहिलाच पाठपुरावा नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तत्कालीन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेऊन यासंदर्भात विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. शहरातील जन्म-मृत्यू नोंदींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या चर्चेवेळी अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार तसेच गटनेते ॲड. श्याम बडोदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here