Thursday, June 4, 2026

Nagpur : गलफ्रेंडच्या हट्टासाठी बॉयफ्रेंड ने मारला डल्ला ; दोन अल्पवहीन मुलांसह तिघांना अटक

Nagpur : गलफ्रेंडच्या हट्टासाठी बॉयफ्रेंड ने मारला डल्ला ;  दोन अल्पवहीन मुलांसह तिघांना अटक

नागपूर : प्रेमात आंधळे होतात ते आपण आज वर ऐकत आलोय बघत आलोय पण आजकलच्या तरुणांचं प्रेमात वेड होण्याचं प्रमाण जास्त वाढत आहे. असाच एक धक्कादायक आणि अनपेक्षित प्रकार नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे .आपल्या गलफ्रेंडला आयफोन गिफ्ट करण्यासाठी चक्क एका गोदामावर डल्ला टाकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या गोदामात ११.३९ लाख रुपयांचा माल चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यशोधरानगर येथील इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

आरोपीच्या गलफ्रेंड ने मागितला आयफोन ;

यशोधरानगर परिसरात राहुल सिरॅमिक्स प्रा. लि. कंपनी आहे. त्या कंपनी च्या मालकाचं नाव राहुल जयचंद ब्रह्मा आहे . त्याच्या तक्रारी वरून हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे .त्यांच्या गोदामात टाइल्स, सॅनिटरी साहित्य आणि सीपी फिटिंगचा साठा आहे. २७  आणि २८ मेच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावरील टिनपत्रे फोडून आत प्रवेश केला. असे त्याने सांगितले. पोलिसांनी तपासादरम्यान विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले . सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी ५  आरोपीना ताब्यात घेतले . चौकशी केल्या वर त्यांनी चोरीची कबुली दिली . त्या ५ आरोपींपैकी एका अल्पवहीन मुलाच्या गलफ्रेंड ला आयफोन हवा होता तशी तिने त्याच्या कडे मागणी केली परंतु आपल्या कडे तर पैसे नाहीत , घरी पण मागू शकत नाही मग काय करायचे ? तर मित्रा ने सल्ला दिला कि आपण चोरी करूया आणि मित्राच्या मदतीने हा चोरीचा कट रचला गेला.

कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार राहुल जयचंद ब्रह्मा यांचे एक गोडाऊन आहे. टाईल्सचे गोडाऊन, टाईल्स आणि त्याच्यामध्ये आपले जे बाथरूमचे नळ लक्झरियस नळ जे असतात अश्या मालाचा साठा होता. जवळजवळ ११,३९,७१० रुपये त्या सर्व मालाची किम्मत होती दिनांक ०१/०६/२०२६ रोजी त्या आरोपींची ह्या मालाची चोरी केली असत राहुल जयचंद ब्रह्मा ह्याने सांगितले

पोलिसांनी दिली सविस्तर माहिती

घटनास्थळी व्हिजिट केल्यानंतर जवळपासचे कॅमेरे आम्ही पाहिले आणि आमचा जो सोर्स होता, इंटरनल सोर्स, तो ऍक्टिव्ह केला आणि आम्हाला माहिती मिळाली की, मिनीमाता नगर येथे राहणारे जे दोन विधिसंघर्ष बालक आहेत, त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं आणि दोन विधिसंघर्ष बालक यांना आम्ही ताब्यात घेतलं.त्याच्या पालकांसमोर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चोरी केलेला सर्व माळ त्यानी इरफान अली उर्फ इम्मु रमजान अली, राहणार फुटक नगर, यशोधरा. सदर इस्माकडे त्यांनी सदर सर्व मुद्देमाल २०,००० रुपये किमतीमध्ये विकलेला असं त्यानी सांगितले . कबुली मिळताच आम्ही लगेच इरफान अली उर्फ इम्मु रमजान अली ह्याच्या राहत्या घरी गेलो . घराची झडती घेता आम्हाला ६,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला . आम्ही इरफान अटक केलं आहे. त्याची पुढील चौकशी सुरु आहे ह्या आधी त्याने असा चोरीचा माळ किती जनानं कडून घेतला आहे ह्याचा तपास सुरु आहे

सदरच्या कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे कि फक्त गलफ्रेंड ला आयफोन गिफ्ट करण्यासाठी चोरी केली अशी कबुली त्या अल्पवहीन मुलांनी दिली आता त्या अल्पवहीन मुलांना काय शिक्षा होते ह्याच्या कडे सर्वांचं लक्ष आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >