Home ब्रेकिंग न्यूज Illegal Liquor News : दारू माफियांना पोलिसांचा दणका! वसईत १६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट

Illegal Liquor News : दारू माफियांना पोलिसांचा दणका! वसईत १६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट

0
Illegal Liquor News : दारू माफियांना पोलिसांचा दणका! वसईत १६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट
Vasai Illegal Liquor

वसई : पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये (Action Mode) आली असून अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वसईच्या नायगाव पोलिसांनी मालजीपाडा जंगल परिसरातील अवैध गावठी दारूभट्टीवर मोठी कारवाई करत ती जाळून उद्ध्वस्त केली. या कारवाईदरम्यान तब्बल १६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेत मृतांचा आकडा २६ वर पोहोचल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर अवैध (Illegal) दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नायगाव पोलिसांनी मालजीपाडा जंगल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून मोठी कारवाई केली.

https://prahaar.in/2026/06/03/bmc-news-sewage-treatment-plant-in-project-affected-colony-in-mahul-closed/

नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला (Crime Detection Team) मालजीपाडा जंगलात अवैध दारूभट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल परिसरात शोधमोहीम (Search Operation) राबवत छापा टाकला. कारवाईदरम्यान २,८०० लिटर तयार गावठी दारू, ३,२४० लिटर गुळाचा वॉश, तसेच दारू निर्मिती आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे मोठे ड्रम, डोल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत १६ लाख ५७ हजार रुपये इतकी असून पोलिसांनी हा संपूर्ण बेकायदेशीर साठा जागेवरच नष्ट केला.

https://prahaar.in/2026/06/03/municipal-corporations-participate-mumbai-initiative-to-increase-citizen-participation/

पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रकारच्या घटना वसईसह इतर भागांत घडू नयेत यासाठी नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी अवैध हातभट्ट्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (Maharashtra Prohibition Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय करणार नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here