बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर एका नव्या सिनेमाविरोधात घेतलेल्या कायदेशीर भूमिकेमुळे त्याचे नाव चर्चेत आहे. ‘काळा हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानने कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. (Bollywood News)
https://prahaar.in/2026/06/02/minister-adv-ashish-shelar-submit-report-within-15-days-regarding-ownership-and-conservation-of-gopalgad-fort/
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा आणि काही संदर्भ हे सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरणाशी जोडले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, तसेच सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/02/deool-band-2-delivers-a-strong-performance-at-the-box-office-earns-this-many-crores-in-12-days/
सलमान खानच्या वतीने पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये चित्रपटाचे काम आणि त्याचा प्रचार तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अभिनेता किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही घटना, नाव किंवा प्रतिमेचा वापर करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/02/gained-trust-gained-entry-then-struck-for-%e2%82%b925-lakhs-major-shock-for-actress-raveena-tandons-family/
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, संबंधित चित्रपटाच्या कथानकाबाबत काही कलाकारांशी संपर्क साधला जात होता. तसेच चित्रपटाची कथा आणि पात्रांची माहितीही विविध स्तरांवर दिली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळेच अभिनेत्याच्या कायदेशीर टीमने आक्षेप नोंदवला आहे.
दरम्यान, ‘काळा हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु होती. चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच समोर आले असून त्यानंतर सोशल मीडियावर या विषयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणात चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांविषयीही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या वादाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.