Paris : फ्रेंच ओपन 2026 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या आर्यना सबालेंका हिने दमदार खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत (Quarter Final) प्रवेश केला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात सबालेंकाने जपानच्या स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिचा 7-5, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.नाओमी ओसाकाला पराभूत करून २०२६ च्या फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात, सबालेन्काने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना रशियाच्या डायना श्नायडरशी होईल.
1 तास 27 मिनिटांत सामना खिशात
तब्बल 1 तास 27 मिनिटे रंगलेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंमध्ये सुरुवातीला चुरशीची झुंज पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये ओसाकाने सबालेंकाला कडवी टक्कर दिली आणि दोघी 5-5 अशा बरोबरीत होत्या. मात्र निर्णायक क्षणी सबालेंकाने ओसाकाची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट 7-5 ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ कायम ठेवला. ओसाकाने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण बेलारूसच्या खेळाडूने आपल्या दमदार ग्राउंड स्ट्रोक्सच्या जोरावर सेट 6-3 ने जिंकत सामना संपवला.
https://prahaar.in/2026/06/02/lionel-messi-statue-farewell-to-messis-70-foot-statue-the-10-crore-grand-statue-turned-out-to-be-dangerous/
तीन वर्षांनंतर महिलांचा नाईट सेशन सामना
या सामन्याची आणखी एक खास बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांनंतर फ्रेंच ओपनमध्ये महिलांचा सामना नाईट सेशनमध्ये खेळवण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून या लढतीचा आनंद घेतला.
महिलांना अधिक संधी देण्याची सबालेंकाची मागणी
विजयानंतर बोलताना सबालेंकाने आयोजकांच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांच्या सामन्यांनाही नाईट सेशनमध्ये अधिक संधी मिळायला हवी, असे मत तिने व्यक्त केले. चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भविष्यात अशा सामन्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली.
https://prahaar.in/2026/06/02/ipl-2026-final-tim-david-big-blow-to-tim-david-throwing-an-ice-bag-at-the-umpires-cost-him-dearly-50-fine-of-match-fee/
ओसाकाचाही पाठिंबा
पराभवानंतर नाओमी ओसाकानेही महिलांच्या सामन्यांना प्राइम टाइममध्ये अधिक स्थान मिळावे, अशी भूमिका घेतली. टेनिसमधील प्रमुख स्पर्धांमध्ये नाईट सेशनसाठी बहुतांश वेळा पुरुष सामन्यांनाच प्राधान्य दिले जाते, मात्र महिला टेनिसलाही तितकेच महत्त्व मिळायला हवे, असे तिने सांगितले. या शानदार विजयासह आर्यना सबालेंका फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली असून, यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदाच्या सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.