Home महाराष्ट्र नाशिक Nashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज

Nashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज

0
Nashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज

Nashik Vidhan Parishad Election : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. यामुळे कोण निवडणूक लढवणार यावरून चर्चेला उधाण आले होते.

अखेर महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, भाजप अध्यक्ष सुनील केदार, नगरसेवक अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, गुरमित बग्गा यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/01/nashik-news-nashik-police-on-alert-after-pune-poisonous-liquor-case/

महायुतीमधील शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांच्यासह विजय करंजकर, अजय बोरस्ते, अंजुम कांदे इच्छुक होते. मात्र, पक्षाचे मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पक्षातील इतर इच्छुकांना थांबावे लागले. यानंतर शिवसेनेकडून दराडे यांनी आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी महायुतीचे पारडे जड असल्याने त्यांचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र क्रॉस वोटिंग झाल्यास त्याचा फायदा दुसऱ्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here