Team India’s international cricket schedule : आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व मोठ्या दिमाखात पार पडलं आहे. वर्ष 2026 च्या सुरूवातीला वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आता पुरूषांच्या संघाने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला मात दिली आणि आयपीएल 2026 जेतेपदावर नाव कोरलं. यंदाच्या पर्वात (पुरुष संघ ) आरसीबीने जेतेपद कायम राखलं. सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज
आता फ्रेंचायझी क्रिकेटमधून बाहेर येत टीम इंडिया आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. तर टी20 संघाचं कर्णधारपदी सूर्यकुमार यादवकडे असू शकते.
https://prahaar.in/2026/06/01/ipl-2026-virat-kohlis-emotional-post-after-rcbs-second-title-is-viral/
2026 पर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक समोर
भारतीय संघाचं डिसेंबर 2026 पर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक समोर आलं आहे. 6 जूनपासून सामन्यांना सुरुवात होणार असून पहिला सामना न्यू चंदीगडच्या मैदानात होणार आहे. या मैदानात भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असणार आहे. हा कसोटी सामना असून त्यानंतर वनडे आणि टी20 मालिका
खेळल्या जातील.
टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक
जून 2026
6-10 जून: भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना
13-20 जून: भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका (3 सामने)
26-29 जून: भारताचा आयर्लंड दौरा (2 टी20 सामने)
जुलै 2026
1-11 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (5 टी20 सामने)
14-19 जुलै: भारताचा इंग्लंड दौरा (3 एकदिवसीय सामने)
23-26 जुलै: भारताचा झिम्बाब्वे दौरा (3 टी20 सामने)
https://prahaar.in/2026/06/01/good-news-for-football-fans-zee-finally-secures-fifa-world-cup-2026-rights-in-india/
ऑगस्ट 2026
भारताचा श्रीलंका दौरा (2 कसोटी, 3 टी20) – तारखा अद्याप निश्चित व्हायच्या आहेत
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026
17 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: आशियाई खेळ 2026, जपान (टी20 स्वरूप)
27 सप्टेंबर – 3 ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका (3 सामने)
6-17 ऑक्टोबर: भारत-वेस्ट इंडिज टी२० आंतरराष्ट्रीय मालिका (5 सामने)
ऑक्टोबर आणि डिसेंबर 2026
22 ऑक्टोबर – डिसेंबर: भारताचा न्यूझीलंड दौरा (2 कसोटी, 5 एकदिवसीय, 5 टी20)